Ram Lalla Murti Ayodhya : कशी आहे रामलल्लाची मूर्ती? असा आहे चौथ्या मूर्तीच्या निर्माणाचा इतिहास

कशी आहे रामलल्लाची मूर्ती? जाणून घ्या
Ram Lalla Murti Ayodhya : कशी आहे रामलल्लाची मूर्ती? असा आहे चौथ्या मूर्तीच्या निर्माणाचा इतिहास
Updated on

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असलेल्या भव्य समारंभाला 22 जानेवारीला सुरुवात होणार आहे. 16 जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे.

रामल्लाच्या मूर्तीची कहाणी खूप रंजक आहे. तुम्हाला माहित आहे का की भव्य मंदिरात स्थापित होणारी रामल्लाची ही मूर्ती अयोध्येतील राम जन्मभूमीवर स्थापित होणारी चौथी मूर्ती असेल.

रामल्लाची पहिली मूर्ती गणेश भट्ट, दुसरी सत्यनारायण पांडे आणि तिसरी अरुण योगीराज यांनी बनवली आहे. या मूर्तीला चल आणि उत्सव असे नाव दिले आहे. मंदिराच्या प्रांगणात बसवण्यात येणाऱ्या दुसऱ्या मूर्तीला 'अचल मूर्ती' असे नाव देण्यात आले आहे.

अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील गर्भगृहात विराजमान करण्यात आलेल्या राममूर्तीची काही छायाचित्रे शुक्रवारी काही माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत. विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने ही छायाचित्रे प्रसिद्ध केल्याचा दावा या माध्यमांनी केला आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथील कलाकार अरुण योगिराज यांनी ही मूर्ती घडवलेली आहे.

Ram Lalla Murti Ayodhya : कशी आहे रामलल्लाची मूर्ती? असा आहे चौथ्या मूर्तीच्या निर्माणाचा इतिहास
Ram Lalla Murti Ayodhya : गायब झाले, अन् पुन्हा प्रकटले प्रभू श्रीराम... जाणून घ्या अयोध्येतील तिसऱ्या मूर्तीचा इतिहास!

काळ्या पाषाणात घडविण्यात आलेल्या या मूर्तीची उंची ५१ इंच आहे. श्रीरामलल्लाची मूर्ती ही बालरूपातील आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य असलेल्या या श्रीरामलल्लाच्या सर्वांगावर विविध आभूषणे आहेत. ही आभूषणे अत्यंत रेखीवपणे कोरण्यात आलेली आहेत. कमळावर उभ्या असलेल्या श्रीरामलल्लांच्यामागे पाषाणाचीच प्रभावळ असून त्यावर गरुड आणि हनुमंत कोरण्यात आलेले आहेत.

भगवान विष्णूंच्या दशावरतारांच्या मूर्तीही या प्रभावळीवर कोरण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शंख, चक्र, गदा, पद्म, सूर्य, गणपती, प्रणव आणि स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरण्यात आलेली आहेत. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गुरुवारी दुपारनंतर ही मूर्ती राममंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ‘प्रधान संकल्प विधी’ मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला असल्याची माहिती मंदिर ट्रस्टने दिली. संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि सर्व मानवजातीच्या प्रगतीसाठी ही राममूर्ती स्थापन करण्यात येत असल्याचा, तसेच ज्या रामभक्तांनी या मंदिर निर्माणासाठी योगदान दिले आहे त्या सर्वांच्या कल्याणाचा संकल्प करण्यात आल्याचे, प्राणप्रतिष्ठा विधी करणाऱ्या पुरोहितांच्या वतीने सांगण्यात आले.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी काही भाविक हे पायी, काही सायकलवर तर काही चक्क स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.