History Of Hampi : हंपी, कर्नाटकातील सर्वात प्रमुख शहरांपैकी एक, पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यासारखे सर्वात सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतील. जी तुम्हाला इतिहासाची पाने उलटायला भाग पाडतील. इतकेच नाही तर या शहराचा संबंध रामायण काळाशी असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी हे शहर किष्किंधा या नावाने ओळखले जात असे. हे ते ठिकाण आहे जिथे हनुमानजी सुग्रीवाला भेटले होते.
हंपी हे भारताच्या पूर्व-मध्य कर्नाटक येथे स्थित आहे. हंपीला युनेस्कोने भारतातील जागतिक वारसा स्थान म्हणून जाहीर केले आहे. अनेक जून्या इमारती आणि मंदिरांचे अवशेष सध्याच्या कर्नाटकात होस्पेट शहराजवळ आहेत. यात दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदूं साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा" समावेश आहे.
हंपीबद्दल पौराणिक समज असा आहे की, प्राचीन काळापासून येथे रामायण काळातील अनेक आठवणी आहेत. ज्या येथे पाहता येतील. हंपीमध्ये अनेगोंडी नावाचे एक गाव आहे. जे विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी होती. तेथे अंजनाद्री नावाचा पर्वत आहे. याच पर्वतावर भगवान हनुमानजींचा जन्म झाला होता. या पर्वतावर माता अंजनी आणि हनुमान आणि भगवान रामाचे मंदिर आहे. च्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात.
जगातील सर्वात मोठे ओपन-एअर म्युझियम
'हंपी' या ऐतिहासिक शहराला 'जगातील सर्वात मोठे ओपन-एअर म्युझियम' देखील मानले जाते. जे सुमारे 29 चौरस किमीमध्ये पसरलेले आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी या शहरातील लोक हिरे, मोती, घोडे, रेशीम यांचा व्यापार करत असत. त्याचा पुरावा तुम्हाला हम्पीमध्येही दिसेल.
हंपीच्या प्रवासात, तुम्हाला बाजारपेठेसारखे जून्या इमारतींची रचना दिसेल. 100 किमीच्या परिसरात पसरलेले हे ठिकाण प्राचीन काळी परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जात होती.
हंपीचा इतिहास
हंपी शहराबाबत पर्शियन राजदूत अब्दुल रझाक (१५ वे शतक) म्हणाले होते की, जगात हंपीइतके मोठे शहर नाही. त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी कोणतेही दुसरे शहर नाही. १४व्या शतकात हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. हे एक तटबंदी असलेले शहर आहे. पर्शियन आणि युरोपियन प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिवृत्तात असे म्हटले आहे की हंपी हे तुंगभद्रा नदीजवळचे एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते.
इराण आणि पोर्तुगालमधील व्यापाऱ्यांनी येथे आपला व्यापार मांडला होता.[५][६] मुस्लिम सल्तनतांच्या युतीने विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला. १५६५ मध्ये सल्तनती सैन्याने तिची राजधानी जिंकली, लुटली आणि नष्ट केली, त्यानंतर हंपी अवशेष बनून राहिले आहेत.
जवळजवळ संपूर्ण शहर उध्वस्त झाले असले तरी ते दोन भागात विभागले गेले आहे.एक म्हणजे, रॉयल सेंटर इथे तूम्हाला महाल, स्नानगृह, मंडप, शाही तबेले आणि औपचारिक वापरासाठी मंदिरे दिसतील. तर दुसरे तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेले विरूपाक्ष मंदिर आणि हम्पी.
काय आहे प्रसिद्ध
हंपी हे गाव पम्पा क्षेत्र, भास्कर क्षेत्र किंवा किष्किंधा क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. तुंगभद्रा नदीलाच पूर्वी पम्पा नदी म्हणत असत. ह्या नदीच्या नावावरूनच ह्या स्थळाला हंपी असे नाव पडले. हंपीलाच पूर्वी विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाई.
हंपीमधील विरुपाक्ष मंदिर जगप्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली १००० मंदिरे व स्मारके आहेत. १५६५ साली झालेल्या तालिकोटच्या युद्धात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हे शहर उध्वस्त केले होते. तरीही हे अवशेष आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत.
इथल्या विठ्ठल मंदिर परिसरातील मुख्य हॉलमध्ये असलेल्या ५६ स्तंभांवर हातांनी मारले असता त्यांतून संगीताच्या लहरी निघतात. ह्याच ठिकाणी प्रसिद्ध शिला रथ आहे जो पूर्वी खरंच दगडी चाकांवर चालत असे.
कसे जाल
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन : होस्पेट, १३ किलोमीटर अंतरावर आहे
सर्वात जवळचे विमानतळ : तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर अंतरावर आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.