History of India : जगातील सातवं आश्चर्य 'ताजमहल' उभारणारा बादशाह, पण आयुष्यभर कधीही सुखी होऊ शकला नाही

तो बादशहा झाल्यावर मुलगा औरंगजेबानेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तेच केलं
History of India
History of Indiaesakal
Updated on

History of India : मुघलांच्या इतिहासात असाही एक सम्राट होता ज्याचं दु:ख आयुष्यभर कमी झालंच नाही, त्याचं नाव होतं शाहजहान. शाहजहानची आई त्याच्या लहानपणीच वारली. बेगम मुमताज महलचा अकाली मृत्यू झाला आणि मुलगा दारा शिकोहचा खून झाला. इतिहासावर एक नजर मारली तर शहाजहानने सत्ता मिळवण्यासाठी बंड केल्याचे दिसून येतं. आणि तो बादशहा झाल्यावर मुलगा औरंगजेबानेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तेच केलं.

शहाजहानला 'शहजादे खुर्रम' या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. हे नाव त्याला त्याच्या आजोबांनी म्हणजे अकबरने दिलं होतं.

सत्तेत सावत्र आईचा हस्तक्षेप वाढला

शहजादे खुर्रम म्हणजेच शहाजहानचा जन्म 5 जानेवारी 1592 रोजी लाहोर येथे जहांगीर आणि त्याची पत्नी जगत गोसाई हिच्या पोटी झाला. या दाम्पत्याच हे तिसरं अपत्य होतं. 1619 मध्ये त्याच्या आईचां मृत्यू झाला. भाऊ खुस्रोने सत्तेसाठी केलेल्या बंडामुळे खुर्रम हा खरा उत्तराधिकारी मानला जाऊ लागला. मात्र जहांगीरचे नूरजहाँशी लग्न झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. वडील जहांगीर हळूहळू दारू आणि अफूच्या नशा करू लागले. परिणामी नूरजहाँ अघोषितपणे राज्य करू लागली. (Taj Mahal)

अशा परिस्थितीत खुर्रम आणि नूरजहाँ यांच्या नात्यात तणाव वाढला. जहांगीरचा नूरजहानवर इतका विश्वास होता की त्याने इतर कोणाचेही गांभीर्याने ऐकण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे खुर्रम आणि जहांगीर यांच्यातील संबंधही ताणले गेले.

आणि राजकुमाराने बंड केलं

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून हताश झालेल्या खुर्रमने 1662 मध्ये आपल्या वडिलांविरुद्ध बंड केलं परंतु ते अयशस्वी झालं. 1627 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर, मुघल सिंहासनाच्या उत्तराधिकारासाठी खुर्रमने त्याचा सावत्र भाऊ शहरयार मिर्झा आणि नूरजहाँ यांच्याशी संघर्ष केला. खुर्रमने हार मानली नाही आणि सरतेेशेवटी अशी एक वेळ आली की नूरजहाँच्या विरोधात दरबारात विरोध वाढू लागला. यावेळी सगळा दरबार खुर्रम अर्थात शहाजहानच्या बाजूने होता. शेवटी सम्राट शाहजहानने सत्ता ग्रहण केली आणि त्याची सावत्र आई नूरजहाँला नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला.

सावत्र आईची भाची मुमताजशी लग्न केलं..

मुघल साम्राज्यावर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी नूरजहाँने राजपुत्राचा विवाह त्याची भाची अर्जुमंद बानोशी करून दिला होता. तिला लग्नानंतर मुमताज महल हे नाव देण्यात आलं.

अर्जुमंद बानो केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर दूरदृष्टीसाठीही ओळखली जायची. तिला अरबी आणि पर्शियन भाषेत कविता लिहिण्याची आवड होती.

दोघांचा विवाह शाही पद्धतीने झाला

राजदरबारातील ज्योतिषांनी दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित केली, ती 5 वर्षांनंतर होती. त्यामुळेच दोघांना 5 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. शाहजहान गादीवर बसल्यावर अवघ्या चार वर्षात मुमताजचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही काळ आधी मुमताज खूप आजारी होती. शेवटच्या क्षणी तिने शाहजहानशी बोलताना तिच्या स्वप्नाविषयी सांगितलं होतं. तिने त्याला सांगितलं की, मी एका सुंदर महालात होते. असा महाल जगात दुसरीकडे कुठे पाहिलाच नव्हता. असा एखादा महाल तुम्ही मला बांधून द्याल का?

History of India
Taj Mahal : 'ताजमहाल'च्या 22 बंद खोल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; म्हणाले, आधी संशोधन करा मगच..

पण शाहजहानने तिची ही इच्छा पूर्ण करण्याआधीच मुमताजचा मृत्यू झाला. बेगमच्या मृत्यूनंतर, शहाजहानने तिची इच्छा पूर्ण केली आणि ताजमहाल बांधला.

आणि मुलाने बंड केलं..

शहाजहान आता थकत चालला होता, त्याचं वयोमान बघता सत्ता कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी दारा शिकोह आणि औरंगजेब या त्याच्या दोन मुलांची नावं आघाडीवर होती. दाराने सम्राट बनावं अशी शहाजहानची इच्छा होती. पण औरंगजेबाने सत्ता मिळवण्याच स्वप्न पाहिलं आणि ते कोणत्याही किंमतीत पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्याने राजकारण करून दारा शिकोहला ठार केलं आणि नंतर आपल्या वडिलांना म्हणजे शाहजहानला कैदी बनवलं. (Agra)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.