Ram Lalla Murti Ayodhya : मशिदीत मिळाली मूर्ती, अन् सुरू झाला वाद.. काय आहे प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या मूर्तीचा इतिहास?

काय आहे प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या मूर्तीचा इतिहास?
Ram Lalla Murti Ayodhya
Ram Lalla Murti Ayodhyaesakal
Updated on

मागील कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा लवकरच केली जाणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.

रामजन्मभूमी मंदिरातील रामल्लाच्या मूर्तीची कहाणी खूप रंजक आहे. तुम्हाला माहित आहे का की भव्य मंदिरात स्थापित होणारी रामल्लाची ही मूर्ती अयोध्येतील राम जन्मभूमीवर स्थापित होणारी चौथी मूर्ती असेल. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो रामल्लाच्या उरलेल्या तीन मूर्तींचा इतिहास आणि रहस्य काय आहे?

रामललाच्या दुसऱ्या मूर्तीची कथा

रामललाच्या दुसऱ्या मूर्तीचा इतिहास स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९४९ साली सुरू होतो. 22 आणि 23 डिसेंबर 1949 च्या रात्री वादग्रस्त ठिकाणी रामलल्लाची मूर्ती दिसली होती. 'कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकरी'च्या भजनाने संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमून गेली. ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. बातमी आली की 22-23 डिसेंबर 1949 च्या मध्यरात्री रामलल्ला वादग्रस्त ठिकाणी प्रकट झाले.

Ram Lalla Murti Ayodhya
Ram Mandir Ayodhya : महाराज विक्रमादित्यांनी अयोध्येत केली होती श्रीरामाच्या पहिल्या मूर्तीची स्थापना! जाणून घ्या रंजक इतिहास...

रघुकुल कुलभूषण हे बालकाच्या रूपात जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले असल्याचा संदेश आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांपर्यंत पोहोचला. सकाळी पोलिस तेथे पोहोचले तेव्हा शेकडो रामभक्त जमा झाले होते, ज्याची संख्या दुपारपर्यंत 5000 हून अधिक झाली.

23 डिसेंबर 1949 रोजी पोलिसांनी मशिदीत मूर्ती ठेवल्याबद्दल गुन्हा नोंदवला, त्या आधारावर 29 डिसेंबर 1949 रोजी वादग्रस्त ठिकाणी कुलूप लावण्यात आले. जे जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानंतर 1 फेब्रुवारी 1986 रोजी पुन्हा उघडण्यात आले. येथूनच राम मंदिर आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.