कोलकता/भुवनेश्वर - पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशाला (Odisha) जलमय केलेल्या यास चक्रीवादळाने (Yaas Cyclone) बिहार आणि झारखंडलाही तडाखा (Hit) दिला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस (Rain) कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. २८) बंगाल आणि ओडिशाचा दौरा करून बाधित भागांची पाहणी करणार आहेत. या दोन्ही राज्यांत मिळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. (Hit Two Million People by Yass Cyclone)
‘यास’ने बुधवारी रात्री एकच्या सुमारास पश्चिम सिंगभूमच्या मार्गाने झारखंडमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे जोरदार पाऊस कोसळून रस्ते जलमय झाले. राज्यात शुक्रवार (ता.२८) पर्यंत पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळ दक्षिण झारखंडला पोचल्यानंतर वादळ कमजोर झाले आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या वादळाने पश्चिम बंगाल व ओडिशात मोठे नुकसान केले. दोन्ही राज्यांत मिळून २० लाखांपेक्षा जास्त लोकांना त्याचा फटका बसला आहे. पाऊस आणि घरे पडल्याने ओडिशातील तिघांचा, तर बंगालमधील एकाचा मृत्यू झाला. वेगवान वाऱ्यांमुळे अनेक झाडे व विजेचे खांब पडले.
‘यूएन’ मदतीस तयार
भारताच्या पूर्व भागात यास चक्रीवादळ धडकून नुकसान झाले आहे. तडाखा बसलेल्या राज्यांनी विनंती केल्यास त्यांना मदत करण्याची तयारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दर्शविली आहे. ‘यूएन’शी संबंधित अनेक संघटना सकारात्मक प्रतिसाद देतील, असे त्यांनी सांगितले.
‘यास’चा प्रभाव
बिहार : २६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. २६ विमान उड्डाणे रद्द. ‘एनडीआरएफ’च्या २४ तुकड्या तैनात.
पश्चिम बंगाल : तीन लाख लोक बेघर.
झारखंड : २१ जिल्ह्यांमध्ये संततधार सुरु. सुमारे २०० गावांतील वीज पुरवठा खंडित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.