बेंगलुरु : कर्नाटकातील बेंगलुरु या शहरात एक असा प्रकार घडला आहे, जो ऐकून तुम्हाला जबर धक्का बसेल. एका HIV संक्रमित व्यक्तीने त्याच्या पत्नीला जबरदस्तीने कंडोमसारख्या कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडलं आहे. याला एकप्रकारे 'रिव्हेंज इन्फेक्शन' म्हणता येईल. या पुरुषाचा त्याच्या पत्नीच्या नात्यामधील निष्ठेबाबत संशय होता. त्यामुळे त्याने आपले सहा वर्षांचे नाते संपुष्टात आणलं. आणि तिला औषध देऊन तिच्याशी असुरक्षित लैंगिक संबध प्रस्थापित केले, असे त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी हा एक कॅब ड्रायव्हर आहे.
या प्रकरणातील पीडिता 28 वर्षांची असून तिची HIV च्या चाचणीचा निष्कर्ष अद्याप यायचा आहे. ही पीडिता कला क्षेत्रातून पदवीधर असून ती एक गारमेंट फॅक्टरी वर्कर, आहे. या प्रकरानंतर तिने बनशंकरी महिला पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर तिला कुटुंब समुपदेशन केंद्र परिहारकडे पाठवण्यात आलं.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, या दोघांचंही लग्न 2015 मध्ये झालं असून सध्या घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहेत. यातील आरोपी हा महिलांशी फसवणूक करणारा व्यक्ती असून त्याने अनेकांसोबत या प्रकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातून तो आणि त्याची बहिण पैसे कमवायचे. याच प्रकारे त्यांनी 2015 मध्ये पीडितेला फसवलं होतं, असाही आरोप आहे.
लग्नानंतर आरोपीने सुरुवातीला त्या महिलेला माडीवाला येथील एका इमारतीत एका खोलीच्या निवासस्थानात ठेवलं होतं आणि ते आपल्या मावशीचे घर असल्याचा दावा केला होता. परंतु त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आणि तिला आणि इतर काही महिलांना वेश्याव्यवसाय रॅकेट चालवत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं होतं. "ड्रायव्हरने या प्रकरणातून तिची सुटका केली आणि तीची समजूतही घातली.
त्यांच्या काही महिन्यांच्या नात्यानंतर, त्या महिलेला तो काही गोळ्या खाताना दिसला. त्यानंतर त्याने मान्य केलं की तो HIV संक्रमित असून पहिल्या पत्नीपासून त्याला HIV ची लागण झाली आहे. हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र, तरीही तिला त्याच्यासोबत नाईलाजास्तव रहावं लागलं कारण तिने याआधीच आपल्या कुटुंबबियांना सोडलं होतं. गेल्या सहा वर्षांच्या त्यांच्या नात्यामध्ये त्या आरोपीने तिच्यासोबत कधीच असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले नाहीत. मात्र, तिला दर सहा महिन्याला HIV ची टेस्ट खबरदारी म्हणून करावी लागायची. हे क्षण तिच्या आयुष्यातले सर्वांत वाईट क्षण होते.
गेल्या ऑगस्टमध्ये महिलेचा एक नाईट ड्रेस गायब झाल्यानंतर तिला संशय आला. तिला तिच्या पतीच्या मोबाईलवर एक फोटो दिसला ज्यामध्ये त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये सोफ्यावर बसलेल्या एका अनोळखी महिलेने हाच ड्रेस परिधान केला होता. तिचा नवरा HIV पॉझिटिव्ह असूनही ती त्याच्यासोबत राहूनही हा पुरुष आपली फसवणूक करत आहे, हे तिच्या लक्षात आल्याने ती आतून प्रचंड हलली. आणि ती त्याला सोडून आईच्या घरी गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.