Amit Shah : लोकसभा निवडणुकीबाबत अमित शहांचं मोठं भाष्य; म्हणाले, भाजपसाठी कोणतंच आव्हान..

2024 च्या निवडणुकीत देशातील जनता भाजपचा (BJP) प्रमुख विरोधी पक्ष ठरवेल.
Amit Shah News
Amit Shah Newsesakal
Updated on
Summary

'2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपसाठी (BJP) कोणतीही स्पर्धा किंवा आव्हान नाही.'

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपसाठी (BJP) कोणतीही स्पर्धा किंवा आव्हान नाही. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मनापासून पाठिंबा देत आहे, असं स्पष्ट मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं.

एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत शहा (Amit Shah News) यांनी 2024 च्या निवडणुकीत देशातील जनता भाजपचा (BJP) प्रमुख विरोधी पक्ष ठरवेल, असं स्पष्ट केलं. केंद्राच्या पुढाकारामुळं तळागाळातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचंही शहांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधत ते म्हणाले, त्यांनी (काँग्रेस) कदाचित मतदानापूर्वी राज्यांमध्ये प्रचार केला नसेल. परंतु त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीच्या निकालांवरून विरोधी पक्षाची ताकद दिसून येईल. ज्या राज्यात एकेकाळी त्यांची सत्ता होती. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह यंदाच्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही शहांनी व्यक्त केला.

Amit Shah News
Amit Shah : कोणाला घाबरण्याची गरज नाही; अदानी-हिंडेनबर्ग वादावर अमित शहांचं पहिल्यांदाच मोठं वक्तव्य

शहा पुढं म्हणाले, आज भारतानं आपल्या कामगिरीमुळं जगभरात ओळख निर्माण केलीये. आठ वर्षांच्या अल्प कालावधीत आम्ही देशातील 60 कोटी गरीब लोकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यात यशस्वीही झालो. आम्ही खूप काही साध्य केलं. रेल्वेमध्ये मोठे बदल झाले आहेत, अंतराळ क्षेत्रात नवीन धोरण आणलं आहे आणि आम्ही या क्षेत्रात अग्रेसर होण्याची तयारी करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Amit Shah News
Sangli News: पोटचा मुलगा दिला भावाला अन् भावाच्या लेकीला घेतलं 'दत्तक'; ऐतिहासिक निर्णयाचं सर्वत्र कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.