आपण कितीही सुशिक्षित असलो किंवा समाजातील जातीय भेदभाव मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी कुठं ना कुठं 'ऑनर किलिंग'चं प्रकरण समोर येतच!
तंजावूर : आपण कितीही सुशिक्षित असलो किंवा समाजातील जातीय भेदभाव मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी कुठं ना कुठं 'ऑनर किलिंग'चं प्रकरण समोर येतच! असाच एक धक्कादायक प्रकार तामिळनाडूतून (Tamil Nadu) समोर आलाय. इथं एका नवविवाहित जोडप्याला ठार मारण्यात आलंय. कारण, दोघंही वेगवेगळ्या जातीतील होते आणि त्यांनी आंतरजातीय विवाह केला, म्हणून मुलीच्या लोकांनी हे घृणास्पद कृत्य केलंय. मुलगी अनुसूचित जातीची होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी तंजावूर जिल्ह्यातील कुंभकोणमजवळील (Kumbakonam in Thanjavur District) थुलुक्कावेली गावात (Thulukkaveli) मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या 'ऑनर किलिंग' प्रकरणात नवविवाहित जोडप्याची हत्या करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितलं की, चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात (Chennai Hospital) परिचारिका म्हणून कार्यरत असलेली सरन्या (२४) काही दिवसांपूर्वी व्ही. मोहन (३१) सोबत पळून गेली होती. तीन दिवसांपूर्वी दोघांचं लग्नही झालं होतं. याबाबतची माहिती त्यांनी घरच्यांना दिली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी नवविवाहित जोडप्याला जेवणासाठी बोलावलं.
संध्याकाळी जेव्हा हे जोडपं गावात पोहोचलं, तेव्हा सरन्याचा मोठा भाऊ एस. शक्तीवेल (31) आणि तिच्या कुटुंबातील सदस्य रणजित (28) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात सरन्या आणि मोहन या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून मृतदेह कुंभकोणम येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. तर, चोलापुरम पोलिसांनी गुन्हा दाखल करून शक्तीवेल आणि रंजीत यांचा शोध सुरू केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.