Odisha Railway Accident : ओडिशात पुन्हा विचित्र रेल्वे अपघात, 6 मजुरांना मालगाडीने चिरडले

पावसामुळे मजुरांनी घेतला होता मालगाडीचा आश्रय
Odisha Railway Accident (File Photo)
Odisha Railway Accident (File Photo)
Updated on

बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर ओडिशातून आणखी एका भीषण रेल्वे अपघाताची बातमी येत आहे. मालगाडीच्या धडकेने 6 मजुरांचा मृत्यू झाला. ओडिशाच्या जाजपूर केओंझार रोड रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या धडकेने किमान 6 मजूर ठार तर 2 गंभीर जखमी झाले.

रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ही वेदनादायक घटना घडली. मजूर रेल्वेच्या साईडिंगवर काम करत होते जिथे मालगाडी उभी होती. अचानक वातावरण खराब झाले आणि पाऊस सुरू झाला. हे टाळण्यासाठी मजूर ट्रेनखाली बसले. मालगाडीला इंजिन बसवले नव्हते त्यामुळे पावसामुळे गाडी पुढे जाऊ लागली आणि दुर्दैवाने मजूर त्याला बळी पडले. (Odisha Railway Accident )

Odisha Railway Accident (File Photo)
Sanjeev Jeeva Assassination: मुख्तार अन्सारीला इशारा? जवळच्या सहकाऱ्याची हत्या! यूपीच्या कोर्टात घडला थरार

मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा -

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाजपूर रोड स्टेशनवर रेल्वेच्या कामात गुंतलेल्या सहा मजुरांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना योग्य उपचार देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

जखमींना रेल्वेने एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पाच दिवसानंतर ही घटना घडली, ज्यात २८८ लोकांचा मृत्यू झाला होता.

Odisha Railway Accident (File Photo)
Biporjoy Cyclone : महाराष्ट्रात धडकणार 'बिपरजॉय' चक्रीवादळ, मुंबई- पुण्यासह 'या' जिल्ह्यांना धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.