Accident News: बस रिक्षा यांच्यातील भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू; 7 जण जखमी

रिक्षा आणि खासगी बसच्या अपघातात रिक्षातील सात महिलांचा मृत्यू झाला, या रिक्षातून एकूण 14 जण प्रवास करत होते
Accident News
Accident Newsesakal
Updated on

आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात काल(रविवारी) दुपारी अत्यंत भीषण अपघात घडला. ऑटो रिक्षा आणि बस यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या सातही महिला रिक्षातून प्रवास करत होत्या. धक्कादायक बाब म्हणजे अवघे सात लोक बसण्याची क्षमता असलेल्या रिक्षामधून 14 जण प्रवास करत होते. या अपघातातील आणखी सातजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुपारी साडेतीन वाजता तल्लारेवू बायपास रोडवरील राजमार्गावर विरुद्ध दिशेने जात असलेल्या एका भरधाव खासगी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही बस यानमकडे जात होती. आसन क्षमता कमी असुनही त्यांनी जास्त अधिक प्रवासी रिक्षात बसवण्यात आले होते.

पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघातातून ऑटो रिक्षा चालक थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षातून प्रवास करणाऱ्या 14 जणांपैकी सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या रिक्षात सात प्रवासी बसण्याची क्षमता होती. मात्र, या रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्यात येत होते.

Accident News
Cyclone Mocha Update: 'या' राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर या मृतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. ही रिक्षा प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. बस आणि रिक्षा दोघांचंही नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास केले. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. तसेच या अपघातातील वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

Accident News
Ahmednagar Violence: मिरवणुकीवर दगडफेकीनंतर शेवगावमध्ये दोन गटात राडा; ४ जण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.