UP मध्ये भयावह परिस्थिती; गंगा किनारी वाळूत पुरले शेकडो मृतदेह

UP मध्ये भयावह परिस्थिती; गंगा किनारी वाळूत पुरले शेकडो मृतदेह
Updated on

UP त भयावह परिस्थिती; गंगा किनारी वाळूत पुरले शेकडो मृतदेह

बिहार आणि मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील कोरोनाची भयावह परिस्थिती समोर आली आहे. उन्नाव येथे गंगा नदीच्या किनाऱ्यालगत वाळूत शेकडो मृतदेह पुरल्याचं उघड झाले आहे. गंगा नदीच्या किनाऱ्याला वाळूत शेकडो मृतदेह आढळले आहेत. आमचं पथक गंगा नदीच्या किनाऱ्याला आणि परिसरात अवैध पुरण्यात आलेल्या मृतदेहाचा शोध घेत आहे. पथकाला शोध आणि तापस करण्याची परवानगी देण्यात आली. गरज पडल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असं उन्नाव जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अंत्य संस्कार करण्यासाठी लाकडं मिळत नसल्यामुळे मृतदेह पुरण्यात येत आहेत. याआधी मध्य प्रदेश आणि बिहारमधील भयावह परिस्थिती समोर आली होती. आता उत्तर प्रदेशमध्येही अशीच भयावह परिस्थिती समोर आली आहे.

गंगा नदी किनाऱ्याला वाळूत मृतदेह आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीतील पाण्याचा पिण्यासाठी आणि जनावरे धुण्यासाठी देखील वापर केला जातो. या मृतदेहांमुळे ज्या भागांत संसर्ग पोचला नव्हता तिथे देखील रोगराईचा प्रसार होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गंगेच्या पात्रामध्ये जाळ्या

उत्तर भारतातील गंगेच्या काठावरील बहुतांश राज्यांमध्ये मृतदेहांना अटकाव करण्यासाठी नदीपात्रामध्ये लोखंडी जाळ्या अंथरल्या जात आहेत. ज्या ठिकाणी गंगा नदी बिहारमध्ये प्रवेश करते त्या सीमावर्ती भागात नदी पात्रात या जाळ्या बसविण्याचे काम सुरू असून असून पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आल्याचे बिहारचे जलसंपदामंत्री संजयकुमार यांनी सांगितले.

कोरोना प्रसाराचा धोका नाही

वैद्यकीय तज्ज्ञांनी मात्र गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. यामुळे कोरोना पसरणार नसला तरीसुद्धा अन्य आजारांच्या संसर्गाचा धोका कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे दूषित पाणी पिल्याने लोकांमधील पोटांचे विकार वाढू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

बिहार आणि मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील (UP) कोरोनाची भयावह परिस्थिती समोर आली आहे. उन्नाव (unnao) येथे गंगा नदीच्या (Ganga) किनाऱ्यालगत वाळूत शेकडो मृतदेह पुरल्याचं उघड झाले आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचं आदेश दिले आहेत. 'गंगा नदीच्या किनाऱ्याला वाळूत शेकडो मृतदेह आढळले आहेत. आमचं पथक गंगा नदीच्या किनाऱ्याला आणि परिसरात अवैध पुरण्यात आलेल्या मृतदेहाचा शोध घेत आहे. पथकाला शोध आणि तापस करण्याची परवानगी देण्यात आली. गरज पडल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असं उन्नाव जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. '

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अंत्य संस्कार करण्यासाठी लाकडं मिळत नसल्यामुळे मृतदेह पुरण्यात येत आहेत. याआधी मध्य प्रदेश (madhya pradesh) आणि बिहारमधील (bihar) भयावह परिस्थिती समोर आली होती. आता उत्तर प्रदेशमध्येही अशीच भयावह परिस्थिती समोर आली आहे. गंगा नदी किनाऱ्याला वाळूत मृतदेह आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीतील पाण्याचा पिण्यासाठी आणि जनावरे धुण्यासाठी देखील वापर केला जातो. या मृतदेहांमुळे ज्या भागांत संसर्ग पोचला नव्हता तिथे देखील रोगराईचा प्रसार होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

UP मध्ये भयावह परिस्थिती; गंगा किनारी वाळूत पुरले शेकडो मृतदेह
याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्‍कम परत

गंगेच्या पात्रामध्ये जाळ्या

उत्तर भारतातील गंगेच्या काठावरील बहुतांश राज्यांमध्ये मृतदेहांना अटकाव करण्यासाठी नदीपात्रामध्ये लोखंडी जाळ्या अंथरल्या जात आहेत. ज्या ठिकाणी गंगा नदी बिहारमध्ये प्रवेश करते त्या सीमावर्ती भागात नदी पात्रात या जाळ्या बसविण्याचे काम सुरू असून असून पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आल्याचे बिहारचे जलसंपदामंत्री संजयकुमार यांनी सांगितले.

कोरोना प्रसाराचा धोका नाही

वैद्यकीय तज्ज्ञांनी मात्र गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. यामुळे कोरोना पसरणार नसला तरीसुद्धा अन्य आजारांच्या संसर्गाचा धोका कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे दूषित पाणी पिल्याने लोकांमधील पोटांचे विकार वाढू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.