RG Kar Case: ''त्या' ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप झाला नव्हता'', CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर

Kolkata doctor rape case: प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर केवळ संजय रायने रेप केला होता, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. क्रूरकृत्य केल्यानंतर त्याने डॉक्टरचा खून केला. सीबीआयने आरोपी संजय रायच्या विरोधात खून आणि बलात्कार केल्याप्रकरणी चार्जशीट दाखल केलं आहे.
RG Kar Case: ''त्या' ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप झाला नव्हता'', CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर
Updated on

RG Kar Hospital Case: कोलकातामधल्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सोमवारी सीबीआयने चार्जशीट दाखल केलं. कोलकाता येथील सियालदह कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये सीबीआयने एक खुलासा केला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर गँगरेप झाला नाही, असा दावा केला आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर केवळ संजय रायने रेप केला होता, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. क्रूरकृत्य केल्यानंतर त्याने डॉक्टरचा खून केला. सीबीआयने आरोपी संजय रायच्या विरोधात खून आणि बलात्कार केल्याप्रकरणी चार्जशीट दाखल केलं आहे.

सीबीआयच्या चार्जशीटमध्ये २०० लोकांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. हे चार्जशीट दोनशेपेक्षा जास्त पानांचं असून या प्रकरणातलं हे पहिलंच चार्जशीट आहे. पुढील तपासानंतर सीबीआयकडून आणखी एक चार्जशीट दाखल करु शकतं. CBIने अनेक तथ्य कोर्टासमोर सादर केले आहेत.

RG Kar Case: ''त्या' ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप झाला नव्हता'', CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर
Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

ब्लूटूथ डिव्हाईसवरुन संजय रायचा शोध

संजय राय हा हॉस्पिटलसाठी सिविक वेल्फेअर वॉलंटियर म्हणून काम करत होता. हॉस्पिटलच्या मेन गेटचं सीसीटीव्ही आणि डेड बॉडीच्या जवळ आरोपी संजय रायच्या ब्लूटूथ डिव्हाईसवरुन संजय रायची पुष्टी झाली होती. ८ ऑगस्टच्या सकाळी कोलकाता येथे गेल्यानंतर संजय राय थेट आरजी कर हॉस्पिटमध्ये गेला. ९ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता संजय राय एका रुग्णाच्या मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता.

त्याच रात्री त्याने रुग्णाच्या नातेवाईकासोबत मद्यप्राशन केलं. पहाटे तीन वाजता संजय रुग्णालयाच्या चेस्ट फिजिशियन विभागात येतो. त्यानंतर तो सेमिनार हॉलमध्ये घुसतो तिथे डॉक्टर तरुणी आराम करत होती. अगोदर त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिचा जीव घेतला. ४०-४५ मिनिटांतर संजय सेमिनार हॉलमधून गडबडीने निसटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.