नवी दिल्ली : १५ हजारांपेक्षा कमी मासिक पगार असणारांसाठी खूशखबर आहे. जर तुमचा मासिक पगार १५ हजार किंवा त्याहून कमी असेल आणि वय ४० वर्षांहून कमी असेल केंद्र सरकारने अशा लोकांसाठी विशेष पेंशन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन असे या योजनेचे नाव आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घराजवळ असलेल्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटरबद्दल माहिती नसेल तर एलआयसी किंवा श्रम मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवता येईल. याशिवाय जिल्हा रोजगार कार्यालय, एलआयसी ऑफीस, ईपीएफ आणि ईएसआयसी च्या कार्यालयात जाऊन अकाऊंट उघडता येऊ शकेल.
इथल्या ग्रामस्थांनी दिला दिडशे गरजूंना मदतीचा हात
जर कर्मचाऱ्याचे आधीच EPF/NPS/ESIC यापैकी कोणते खाते असेल तर तो या योजनेचा हिस्सा बनू शकत नाही. आयकर भरत असलेल्यांना याचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बॅंक खात्याचा तपशिल लागेल. IFSCकोड, पासबुक इत्यादी द्यावे लागेल.
नोंदणी करण्याची पद्धत
घराजवळ असलेल्या कॉमन सर्विस सेंटरला जा. ते माहीत नसल्यास एलआयसी, कामगार कार्यालय किंवा सीएससीच्या वेबसाईटवर जा.
सोबतच आधार कार्ड, बॅंक खात्याची डिटेल्स, बॅंक पासबुक, चेकबुक किंवा बॅंक स्टेटमेंट जोडा.
कोणत्या इतर योजनांमध्ये गुंतवणूक केली असल्यास त्याचा तपशील द्यावा.
तुम्हाला किती रक्कम भरायची आहे हे तुम्हाला सांगितले जाईल. प्रत्येकाच्या वयोमानानुसार ती रक्कम बदलते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.