Aadhar Card For NRI: आता एनआरआयसुद्धा आधारसाठी अर्ज करू शकतात?

NRI आधार कार्डसाठी अर्ज कसा करू शकतात, जाणून घ्या
Aadhar Card For NRI
Aadhar Card For NRIsakal
Updated on

आधारकार्ड हे डॉक्युमेंट भारताचा निवासी असण्याच सर्वात मोठं आणि मूलभूत डॉक्युमेंट आहे. पण एनआयआर सुद्धा यासाठी अर्ज करू शकतो का? याबाबत बराच संभ्रम आहे; UIDAI म्हणते की NRI देखील आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. (Aadhar Application for NRI)

भारतात पॅन कार्डपासून ते बँक खात्यांपर्यंत, प्रत्येक गोष्ट तुमच्या आधारशी लिंक आहे, ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट बनला आहे. सरकार पुरस्कृत अनेक योजनांनी त्यांच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. म्हणूनच हे डॉक्युमेंट अनिवासी भारतीयांसाठी (NRI) देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

पण, अनिवासी भारतीयांना ते आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात की नाही याबद्दल अनेकदा अस्पष्टता असते. UIDAI ने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केले आहे की वैध भारतीय पासपोर्ट असलेला अनिवासी भारतीय आधार कार्डसाठी अर्ज करू शकतो.

Aadhar Card For NRI
UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस

याची चाचपडताळणी कोणीही UIDAI आधारच्या FAQ विभागाला भेट देऊन करू शकतो. आधार कार्ड नोंदणीबाबत NRI लोकांनी विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया NRI साठी उर्वरित भारतीय नागरिकांसारखीच आहे.

Aadhar Card For NRI
Chemical Stock: या केमिकल कंपनीचा 4000% पेक्षा जास्त परतावा, आता स्टॉक स्प्लिटचा निर्णय...

NRI आधार कार्डसाठी अर्ज कसा करू शकतो?

  • UIDAI ने NRI द्वारे आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रियेचा देखील उल्लेख केला आहे.

  • स्टेप 1: तुमच्या जवळच्या कोणत्याही आधार सेवा केंद्रात जा.

  • स्टेप 2: तुमचा वैध भारतीय पासपोर्ट तुमच्यासोबत घेऊन जा

  • स्टेप 3: नावनोंदणी फॉर्म घ्या आणि सर्व आवश्यक तपशीलांसह भरा. तुम्ही नावनोंदणी फॉर्ममध्ये भरलेले तपशील तुमच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या तपशीलांशी जुळत असल्याची खात्री करा.

  • स्टेप 4: अर्जदाराने फॉर्ममध्ये त्यांचा ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.

  • स्टेप 5: नंतर ऑपरेटरला तुमची NRI म्हणून नोंदणी करण्यास सांगा

Aadhar Card For NRI
TET Admit Card: विद्यार्थीनीच्या परीक्षा प्रवेशपत्रावर चक्क 'सनी लियोनी'!

तुमचा आधार कार्ड 3-4 दिवसात तयार होईल. पण कधीकधी डॉक्युमेंट तयार होण्यास आणखी काही वेळ लागू शकतो. अर्जदारांनी त्यांच्या आधार कार्डचे स्टेटस नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. आधार कार्ड स्टेटस तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

https://myaadhaar.uidai.gov.in/CheckAadhaarStatus

ज्यांनी चुकून त्यांचा 14 अंकी नाव नोंदणी आयडी हरवला असेल, ते तपशील पुनर्प्राप्त करण्यासाठी त्यांचा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरू शकतात. तुमच्या 14 अंकी नावनोंदणी आयडीची माहिती पुनर्प्राप्त करण्याचा पर्याय देखील वेबसाइटवर देण्यात आला आहे.

Aadhar Card For NRI
SIM Card : आता सहजासहजी मिळणार नाही सिम कार्ड; हीच कागदपत्रे ठरतील वैध

नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

NRI अर्जदारांसाठी त्यांनी भारतीय मोबाइल नंबर देणे गरजेचे आहे. कारण UIDAI आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर स्वीकारत नाही.

UIDAI वेबसाइटनुसार, पासपोर्ट पत्त्याचा आणि जन्मतारीखचा पुरावा म्हणून काम करतो. तथापि, अर्जदार UIDAI वेबसाइटवर नमूद केलेल्या मंजूर कागदपत्रांच्या यादीतील इतर वैध कागदपत्रे देखील देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.