'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही

'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूने जगभरात धूमाकूळ घातला आहे. या विषाणूचे नवनवे म्युटेशन्स सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. डेल्टा या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगितलं गेलं. मात्र, आता या व्हेरियंटचंच नवे म्युटेशन समोर आले आहे. या म्युटेशनला 'डेल्टा प्लस' असं नाव दिलं गेलं आहे. हा व्हायरस सर्वांत आधी भारतातच सापडला असून हा मोठ्या चिंतेचं कारण आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही
शरद पवार-प्रशांत किशोर पुन्हा भेटले; 12 दिवसांतील तिसरी भेट

कितपत झालंय संक्रमण?

आतापर्यंत भारतात डेल्टा प्लस विषाणूचे एकूण 40 रुग्ण आढळून आले आहेत. यामधील 15 ते 20 रुग्ण तमिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळून आले आहेत तर या 40 रुग्णांपैकी 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी तर जळगावमध्ये 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडल्याचे कळते. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे हजारो नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईत दिली. याबाबत अधिक माहिती देताना टोपे म्हणाले, ''राज्याने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाहीला प्रारंभ केला आहे आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या संस्थेचा सहभाग यामध्ये आहे. 15 मे पासून 7500 नमूने घेण्यात आले असून त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 जणं आढळून आले आहेत.''

'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

तज्ज्ञ काय सांगतात?

महाराष्ट्रातील तज्ज्ञ अशी चिंता व्यक्त करत आहेत की, या नव्या व्हेरियंटमुळे कदाचित तिसरी लाट येऊ शकते. हा चिंताजनक यासाठी आहे कारण याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाहीये की तो कितपत घातक आहे, अशी माहिती महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य ओम श्रीवास्तव यांनी दिली आहे. आतापर्यंत जेवढे व्हेरियंट आढळले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक गतीने पसरणारा हा व्हेरियंट आहे. अल्फा व्हेरियंट देखील खूपच संक्रमणकारी आहे मात्र डेल्टा याहून 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. थोडक्यात तो सुपर-स्प्रेडर आहे.

'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही
पाकिस्तान - दहशतवादी हाफीज सईदच्या घराबाहेर स्फोट; 12 जखमी

काय आहे डेल्टा प्लस व्हेरियंट?

डेल्टा प्लस व्हेरियंट हा B.1.617.2 स्ट्रेन अर्थात डेल्टा व्हेरियंटचा म्युटंट व्हर्जन आहे. B.1.617.2 या स्ट्रेनचं 'डेल्टा' असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण करण्यात आलं होतं. अधिकृत माहितीनुसार, डेल्टा प्लस व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य आहे. 'डेल्टा प्लस' व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस' व्हेरियंट'च्या निर्मितीबाबत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी 'डेल्टा व्हेरियंट' कारणीभूत होता. त्यातच आता या व्हेरियंटचं आणखी एक म्युटेशन झाल्याचं आढळून आलं आहे. यालाच 'डेल्टा प्लस' किंवा 'AY.1' असं नाव देण्यात आलं आहे."

भारताबाहेर कुठे आढळलाय डेल्टा प्लस?

डेल्टा प्लस हा कोरोनाचा व्हेरियंट आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, रशिया, चीन आणि भारत या देशात सापडला आहे. डेल्टा व्हेरियंट हा गतीने ब्रिटनमध्ये पसरला असून ब्रिटनमधील 99 संक्रमण हे डेल्टामुळे झाले आहे. 18 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, डेल्टा प्लसचे जगभरात 205 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील अर्ध्याहून अधिक रुग्ण समाविष्ट आहेत. डेल्टा प्लसचा आणखी व्हेरियंट आढळला आहे. AY.2 असं याचं नाव असून तो अमेरिकेत सापडला आहे. अद्याप भारतात त्याचा शिरकाव झालेला नाहीये.

'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही
माल्ल्या-मोदी-चोक्सीला दणका! 9,371कोटींची संपत्ती बँकांकडे

डेल्टा प्लस व्हेरियंटवर कोरोना लस प्रभावी?

डेल्टा प्लस हा डेल्टा या व्हेरियंटमधूनच तयार झाला आहे. मग, कोव्हिडविरोधी लस यावर प्रभावी ठरेल? याबाबत संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. इश्वर गिलाडा यांनी म्हटलंय की, डेल्टा व्हेरियंट लस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देतो हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे, डेल्टा प्लसही रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची शक्यता आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण याबद्दल म्हणाले, "कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहेत. डेल्टा प्लसचा लशीवर परिणाम होतो का याबाबतची माहिती येत्या तीन-चार दिवसात दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.