आता Delmicron चा धोका! ओमिक्रॉन आणि डेल्मिक्रॉनमध्ये काय आहे फरक?

Delmicron
Delmicrongoogle
Updated on

नवी दिल्ली : ओमिक्रॉनने (Omicron) युरोपीय देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. तसेच भारतात देखील समूह संसर्ग (Omicron Community Spread) होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे (Maharashtra Omicron Cases) सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. तसेच डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनची संसर्ग क्षमता अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे. त्यातच आता कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आढळला असून त्याचे नाव डेल्मिक्रॉन (Delmicron) असं आहे.

Delmicron
काळजी घ्या! देशात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ

डेल्मिक्रॉन काय आहे? (What is Delmicron)

डेल्मिक्रॉन हा कोरोनाचा दुसरा व्हेरियंट असून तो पश्चिमेतील देशांमध्ये पसरत आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही व्हेरियंटला एकत्रित करून डेल्मिक्रॉन असं नाव ठेवण्यात आलं आहे. डेल्मिक्रॉनमुळे युरोप आणि युएसमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, असे राज्य सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी इंडिया टीव्हीसोबत सांगितले. भारतात डेल्टाचे रुग्ण सर्वाधिक होते. पण, देशात ओमिक्रॉन किती भयंकर रुप धारण करेल हे सध्या सांगता येणं कठीण आहे. कारण जगभरात ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. मात्र, तो अजून किती भयंकर रुप घेईल याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही.

Delmicron
अमेरिकेत ओमिक्रॉन रुग्णाच्या पहिल्या मृत्यूची नोंद; भारतात 4 दिवसांत दुप्पट रुग्णसंख्या

ओमिक्रॉनची लक्षणं -

सध्या ओमिक्रॉनवर आणखी संशोधन सुरू आहे. पण, सध्या रुग्णांमध्ये खोकला, सर्दी, थकवा अशी लक्षणं आढळून येत आहेत. तसेच काही रुग्णांमध्ये अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे, मळमळ वाटणे, उलट्या आणि अतिसार असे लक्षणं दिसत आहेत.

ओमिक्रॉनवर उपचार -

कर्नाटकमध्ये आढळून आलेल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाने उपचाराबाबतचा तपशील शेअर केला होता. ''ओमिक्रॉनसाठी कुठलाही विशेष उपचार नाही. त्याला व्हीटॅमीन सी आणि अँटीबॉडीज देण्यात आल्या होत्या. तसेच थकवा जाणवत नसल्यामुळे रुग्णालयामधूनच काम देखील करता आले'' असे त्या रुग्णाने आयएएनएससोबत बोलताना सांगितले.

दरम्यान, येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळतील असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.