India-Maldives: लक्षद्वीप बेट भारताने कसं घेतल ताब्यात? सरदार पटेलांनी बजावली होती महत्त्वाची भूमिका

India Maldives Row: १५ ऑगस्ट १९४७ला भारत पाकिस्तान विभाजनादरम्यान मोहम्मद अली जिनांना वाटत होते की, हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर हे मुस्लीम प्रदेश असल्याने त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हावे. परंतु सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांच्या हुशारीने त्यावेळी भारताचे विभाजन होण्यापासून रोखले होते.
how lakshadweep islands became integral part of india
how lakshadweep islands became integral part of india Sakal
Updated on

- मनोज साळवे

Lakshadweep Islands : १५ ऑगस्ट १९४७ला भारत पाकिस्तान विभाजनादरम्यान मोहम्मद अली जिनांना वाटत होते की, हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर हे मुस्लीम प्रदेश असल्याने त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हावे. परंतु सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांच्या हुशारीने त्यावेळी भारताचे विभाजन होण्यापासून रोखले होते. या विभाजनादरम्यान लक्षद्वीप बेट किती महत्वाचे आहे याचा अंदाज दोन्हींही देशाला आला नव्हता.

त्यावेळी दोन्ही देशांचे लक्ष फक्त संस्थाने आपल्याकडे कशी येतील याकडे होते. पण दुरदृष्टी असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांनी ५५०पेक्षा अधिक संस्थाने सोबत घेऊन त्यांना एकत्रित ठेवण्याचे काम केले. १९४७ च्या शेवटादरम्यान जेव्हा या दोन देशांची नजर लक्षद्वीप बेटाकडे गेली. तेव्हा लक्षद्वीप बेट हे दोन्ही देशांच्या सुरक्षा, व्यापार आणि व्यवसाय या सर्वच दृष्टीने महत्वाचे होते.

त्याच सुमारस दुरदृष्टी असलेल्या सरदार पटेलांना लक्षद्वीप बेटाचे महत्व लक्षात आले आणि त्यांनी मुदायलियार बंधूंना ताबडतोब सैन्याकडे जाण्यास सांगितले. पाकिस्तानचे सैन्य येण्याआधीच रामास्वामी आणि लक्ष्मणस्वामी मुदालियर या दोघांनी लक्षद्वीप बेटावर भारताचा तिरंगा फडकवला. त्यावेळी उशीरा आलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारताचा फडकलेला झेंडा पाहून परतावे लागले.

पाकिस्तानी सैन्य दाखल होण्याअगोदरच भारताने लक्षद्वीप, मिनिकाय, आमीनदीवी समुह ताब्यात घेतले होते. भारताआधी लक्षद्वीप बेटावर टिपू सुलतान आणि ब्रिटिशांचा ताबा होता. जेव्हा हा प्रदेश भारताकडे आला त्यानंतर १९५६ दरम्यान लक्षद्वीपला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

बेटावर बहुतेक लोक हिंदी भाषिक असल्याने पूर्वी भाषेच्या आधारावर हे बेट भारताच्या मद्रास रेसिडेन्सीशी जोडले गेले होते. त्यानंतर १९७१ मध्ये या आइसलॅंडला लक्षद्वीप हे नाव देण्यात आले.

भारतासाठी लक्षद्वीप का महत्वाचे आहे?

लक्षद्वीप छोट्या छोट्या ३६ समूहांपासून बनलेला समुह आहे. भारताच्या समुद्र किनाऱ्य़ापासून जवळच असणारे लक्षद्वीप समुद्रातून भारताला लक्ष करणाऱ्या शत्रूंवर मारा करण्यासाठी एक महत्वाचे ठिकाण आहे. (Why is Lakshadweep important for India?)

भारताची सुरक्षा यंत्रणा ‘’थिंक टॅंक युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या’’ म्हणण्यानुसार अंदमान निकोबार आणि प्रशांत महासागर हे जेवढे महत्वाचे आहेत तितकेच लक्षद्वीपही महत्वाचे आहे.

चीन समुद्रामार्गे भारतावर आक्रमण करण्याचा वारंवार प्रयत्न करते. त्यामुळे भारताच्या सुरक्षा खात्याने लक्षद्वीप बेटाचा विकास करण्याचे ठरवले आहे. बेटाचा विकास झाल्यानंतर भारतीय नौदलातील सैनिकांना शेजारी देशांवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. लक्षद्वीप बेट जेवढे भारताच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे तितकेच पर्यटनासाठी महत्वाचे आहे.

how lakshadweep islands became integral part of india
India-Maldives Row: 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत

भारतातील तसेच देश विदेशातील अनेक पर्यटक लक्षद्वीप पाहण्यासाठी येत असतात. तेथील नारळांच्या बनांनी सजलेले समुद्र किनारे, रुपेरी वाळू, हॉटेल्स, खाद्यपदार्थ तेथे होणारा प्रत्येक सुर्योदय, सुर्यास्त पर्यटकांचा आनंद द्विगुणित करतो. दरवर्षी हे बेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात.

लक्षद्वीप बेट सध्या चर्चेचा विषय का बनले आहे?

नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लक्षद्वीपला पोहचले होते. त्यादरम्यान मोदींनी लक्षद्वीपच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. तेथील काही फोटो मोदींनी सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यामुळे लक्षद्वीप चर्चेचा विषय बनला आहे. (Why is Lakshadweep Island a hot topic right now?)

how lakshadweep islands became integral part of india
India-Maldives Row: भारतासोबतचा वाद मालदीवला पडला महागात; दररोज 'इतक्या' कोटींचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोवर मालदीव मधील काही नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यानंतर भारतामधील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना मालदीव नव्हे तर ‘लक्षद्वीपला’ जाण्याचे आवाहन केले आहे.

भारताने मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. त्यामुळे ८ जानेवारीपासून भारतातून मालदीवला जाणारी हवाई वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

याचा फटका मालदीवच्या पर्यटनाला बसला आहे. भारताने लक्षद्वीप हे ठिकाण मालदीवला पर्याय म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.