2000 Rupees Note : आत्तापर्यंत २००० च्या किती नोटा छापण्यात आल्या? छपाई बंद करण्याचा निर्णय आधीच झाला होता

२०१६ नंतर रिझर्व बँकेने आत्तापर्यंत २००० च्या किती नोटांची छपाई केली आहे?
2000 Currency Notes
2000 Currency NotesSakal
Updated on

भारतीय रिझर्व बँकेने २००० च्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र या नोटा वैध राहणार आहेत, फक्त त्या चलनामध्ये नसतील. क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत रिझर्व बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने सांगितलं आहे की या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत कायदेशीररित्या वैध राहतील.

या २००० च्या नोटा २०१६ मध्ये चलनात आल्या होत्या. तेव्हा केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र त्यानंतर ५०० च्या नव्या नोटा चलनात आणल्या. आता सध्या बाजारात ५००,२००,१००,५०,२०,१० च्या नोटा चलनात आहेत.

२०१६ नंतर रिझर्व बँकेने आत्तापर्यंत २००० च्या किती नोटांची छपाई केली आहे? या नोटा कुठे गायब झाल्या आहेत? या कालावधीत २००० च्या किती नकली नोटा पकडण्यात आल्या? जाणून घ्या... (Latest News)

2000 Currency Notes
2000 Rupees Note: 2000 रुपयांच्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? वित्त सचिव म्हणाले...

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, २०१६ च्या नोटबंदीनंतर १.३ लाख कोटी काळा पैसा बाहेर आला. जेव्हा ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या, तेव्हाच रिझर्व बँकेने २००० हजारांची नोट लाँच केली. २०१६ पासून आजपर्यंत ५०० आणि २००० च्या एकूण ६,८४९ कोटी नोटा छापण्यात आल्या आहेत. २००० च्या नोटा शेवटी २०१८-१९ मध्ये छापण्यात आल्या.

2000 Currency Notes
RBI Decision on 2000 Note : दोन हजाराची नोट का रद्द केली? अखेर RBI ने दिले स्पष्टीकरण

अमरउजालाने दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ मध्य पहिल्यांदा २००० च्या ३५० कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. पुढे दुसऱ्या वर्षी यामध्ये मोठी घट झाली. २०१७-१८ मध्ये फक्त १५.१० कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१८-१९ मध्ये सर्वात शेवटी २००० च्या ४.७० कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१८ मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने २००० च्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.