Aadhar Card: आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करता येतील? जाणून घ्या नाव, पत्ता आणि लिंग बदलाबाबत नियम

UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे.
Aadhar Card: Name, Gender & Address Changing Limit
Aadhar Card: Name, Gender & Address Changing Limitesakal
Updated on

आधार कार्ड हे रोजच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे कागदपत्र आणि ओळखपत्र आहे. व्यवहारातील अनेक खात्यांशी आधार कार्ड लिंक असते. UIDAI ने 2019 मध्ये नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलण्यासाठी मर्यादा निश्चित केली होती. त्यामुळे तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख पुन्हा पुन्हा बदलू शकता असा विचार जर का करत असाल तर ते मुळात चुकीचं आहे. UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. (Aadhar Card: Name, Gender & Address Changing Limit)

UIDAI नुसार, आधार कार्डधारक आयुष्यात फक्त दोनदा नाव बदलू शकतो. तसेच तुम्ही तुमची जन्मतारीख फक्त एकदाच आधारमध्ये बदलू शकता. UIDAI ने 2019 मध्ये नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलण्यासाठी मर्यादा निश्चित केली होती. या बदलासाठी कोणत्याही आधार केंद्राला भेट देण्याची गरज नाही. हे बदल ऑनलाइन पद्धतीने करता येतील.

या बदलाच्याही मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. आधार कार्डवर जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येते. अनेक लोक भाड्याची घरं बदलतात किंवा कधी चुकून चुकीचा पता टाकण्यात आला तर यानंतर पत्ता टाकताना योग्य ती काळजी घ्या कारण कोणत्याही प्रकारच्या कारणाने तुमचा पत्ता चुकला असल्यास तुम्हाल तुमचा पत्ता एकदाच बदलता म्हणजेच अपडेट करता येतो.

Aadhar Card: Name, Gender & Address Changing Limit
तुमचे Aadhaar Card सुरक्षित आहे का? पाच मिनिटांत जाणून घ्या

तसेच UIDAI ने नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलण्यासंदर्भात काही महत्त्वाचे बदल केले. यासाठी काही शुल्क देखील भरावे लागणार आहे.

उदा. जसं बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये, डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये आणि आधार रंगीत डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतील.

Aadhar Card: Name, Gender & Address Changing Limit
Aadhaar Card: तुमच्या आधार कार्डवर किती मोबाईल नंबर आहेत? जाणून घ्या

तारीख टाकताना काही चूक असेल तर जन्मतारखेत बदल करणे शक्य असेल. ऑनलाईन मोडमध्ये लिंग फक्त एकदाच बदलले जाऊ शकते. परंतु, लिंग तपशीलांमध्ये बदल करण्यासाठी, तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. त्याच वेळी, ऑपरेटरने चूक केली असेल तरच जन्मतारीख बदलली जाऊ शकते. जन्मतारीख पुन्हा बदलण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.