Corona Virus in India : भारतात कोरोनाचे किती व्हेरिएंट्स आहेत? BF.7 ला घाबरण्याची गरज आहे?

how many variants of corona in india is there a need to be afraid of chinese variant bf 7
how many variants of corona in india is there a need to be afraid of chinese variant bf 7
Updated on

Corona Virus in India : सध्या जगभरातील 5 कोरोना व्हेरिएंट हे चिंतेचा विषय ठरत आहेत. यामध्ये - अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि ओमिक्रॉन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, 2 व्हेरिएंट देखील आढळले आहेत - lambda आणि MU. हे देखील धोकादायक असू शकतात.

या 7 व्हेरिएंट्सचे हजारो जीनोम, सुमारे 91 हजार 315 आणि त्यांचे 409 लिनिएज भारतात सापडले आहेत. सध्या, BF.7 व्हेरिएंटबद्दल धोका व्यक्त केला जात आहे ज्याने चीनमध्ये कहर केला आहे तो देखील Omicron चा एक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट भारतात ऑक्टोबर 2022 पासून आहे. सध्या भारतात कोविडची सर्वाधिक प्रकरणे ओमिक्रॉन प्रकारातील आहेत.

how many variants of corona in india is there a need to be afraid of chinese variant bf 7
India Corona Update : चिंता वाढली! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या BF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

भारतातील कोरोना व्हेरिएंट्सचे जीनोम सिक्वेन्सिंग करणारी टीम CSIR चे प्रिंसीपल शास्त्रज्ञ डॉ. राजेश पांडे यांच्या मते भारतातील मोठ्या लोकसंख्येला लसीकरण केले नसते, तर Omicron BF.7 चे हे व्हेरिएंट धोकादायक सिद्ध झाला असता. पण आता धोका कमी आहे

how many variants of corona in india is there a need to be afraid of chinese variant bf 7
Coronavirus: चीनमधल्या BF.7 व्हेरियंटची महाराष्ट्रात नोंद नाही - तानाजी सावंत

डॉ. पांडे म्हणतात की चीनमध्ये लसीकरणाचा दर्जा भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारतीय लसी खूप प्रभावी आहेत आणि त्या BF.7 विरोधात प्रभावी सिद्ध होत आहेत.

गुजरातमधील वडोदरा येथे कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचे प्रकरण समोर आले आहे. 61 वर्षीय महिलेमध्ये BF.7 व्हेरिएंट आढळून आला. कोरोनाचा व्हेरिएंट आढल्यानंतर महिलेला घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले . फायझरची लस मिळूनही महिलेला BF.7 व्हेरिएंटची लागण झाली. ही महिला 11 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतून वडोदरा येथे आली होती. महिलेचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी गांधीनगरला पाठवण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()