काय असतो Emergency Visa ? 'अफगाण'मधील लोक असा घेऊ शकतात फायदा

काय असतो Emergency Visa ? 'अफगाण'मधील लोक असा घेऊ शकतात फायदा
Updated on

नवी दिल्ली : मोदी सरकारने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने तिथल्या लोकांसाठी इ-इमर्जन्सी व्हिजा (Emergency Visa) देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून याप्रकारे व्हिजा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. याअंतर्गत कुणीही अफगाणिस्तानचा रहिवासी भारतात येण्यासाठी व्हिजा मिळवण्याचा अर्ज करु शकतो. हा व्हिजा ६ महिन्यांसाठी वैध असणार आहे. याअंतर्गत कोणत्याही धर्माचे लोक या व्हिज्यासाठी अर्ज करु शकतात.

काय असतो Emergency Visa ? 'अफगाण'मधील लोक असा घेऊ शकतात फायदा
महाराजा रणजीत सिंहाच्या पुतळ्याची तोडफोड; भाजपने केला पाकिस्तानचा निषेध

परराष्ट्र मंत्रालयाद्वारे दिल्या गेलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी "e-Emergency X-Misc Visa" ची नवी कॅटेगरी बनवली गेली आहे. याद्वारे केल्या गेलेल्या अर्जांवर तातडीने प्रक्रिया केली जाणार आहे. या अर्जाची तपासणी आणि त्याबाबतची प्रक्रिया दिल्लीमध्ये केली जाईल. तसेच व्हिजासाठी कसल्याही प्रकारचं शुल्क द्याव लागणार नाहीये.

कसा कराल अर्ज?

जर आपल्या परिचयाचे कुणी अफगाणिस्तानमध्ये असतील अथवा तुम्ही स्वत: तिथे अडकला आहात तर भारतात लवकरात लवकर पोहोचण्याचा हा सर्वांत सोपा मार्ग आहे. तर जाणून घेऊयात कसा कराल अर्ज?

सर्वांत आधी या लिंकवर जाऊन क्लिक करावं लागेल.

https://indianvisaonline.gov.in/evisa/tvoa.html

त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजा कॅटेगरीमध्ये "Emergency X-Misc Visa" वर क्लिक करावं लागेल.

काय असतो Emergency Visa ? 'अफगाण'मधील लोक असा घेऊ शकतात फायदा
राज्यात आजपासून दोन दिवस मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

जर ती लिंक क्लिक केल्यावर उघडली नाही तर या लिंकवर क्लिक जा. https://indianvisaonline.gov.in/

त्यानंतर "For eVisa by Bureau of Immigration, Apply here" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला "Apply here for e-visa" हा पर्याय दिसेल.

तिथे तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल. त्यासोबतच त्या माहिती संदर्भातील सर्व कागदपत्रांचा तपशील देखील द्यावा लागेल.

अर्ज करणाऱ्या व्यक्तीला भारतातील आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची माहिती द्यावी लागेल. तसेच अफगाणिस्तानातील एखा ओळखीच्या व्यक्तीची माहिती द्यावी लागेल.

भारताने याआधीही दिलंय शरण

भारताने सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या लोकांना शरण दिलंय. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करजई यांचं भारतातच शिक्षण झालं आहे. तसेच प्रमुख नेते अब्दुल्ला अब्दुल्ला यांचं कुटुंब भारतातच राहतं. याशिवाय खान अब्दुल गफ्फार खान यांची नात यास्मीन निगार देखील भारतात राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.