अशी झाली होती सीडीएस बिपीन रावत यांची जडणघडण

जनरल रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील चौहान राजपूत कुटुंबात झाला होता.
BIpin Rawat
BIpin RawatEsakal
Updated on

पुणे : तामिळनाडुतील कुन्नुर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat Dies in Helicopter Accident) यांच्यासह 14 जणांचे निधन झाले. जनरल रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 उत्तराखंडमधील पौडी गढवाल (Bipin Rawat Birth Place) जिल्ह्यातील चौहान राजपूत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडीलही लष्करात अधिकारी होते. खरे तर रावत कुटुंबीयांची लष्करात भरती होण्याची परंपरा आहे. रावत यांनी 1978 मध्ये 11 व्या गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

BIpin Rawat
मधुलिका रावत : राजकन्या ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आधारवड

रावत यांचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील कँब्रियन हॉल स्कूल, शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनमधून झाले. त्यानंतर खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (NDA) प्रशिक्षण पूर्ण करून ते पुढील प्रशिक्षणासाठी डेहराडून (Dehradun) येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) येथे दाखल झाले. 2011 मध्ये त्यांना चौधरी चरणसिंग मेरठ येथून लष्करी-मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवरील संशोधनासाठी पीएचडी प्रदान करण्यात आली. जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका या मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील आहेत. रावत यांना दोन मुली असून मोठी मुलगी कृतिका हिचे मुंबईत लग्न झाले आहे, तर धाकटी मुलगी तारिणी अजूनही शिकत आहे.

'स्वार्ड ऑफ ऑनर' ने सन्मानित

रावत यांना त्यांच्या आयएमएमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 'स्वार्ड ऑफ ऑनर' (Sword of Honor) ने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या लष्करी सेवेच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपर्ण पदावरील जबाबदाऱ्या पार पडल्या होत्या. आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केले होते. त्यात पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाचा ही समावेश आहे. रावत यांची 01 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराचे उपप्रमुख पदी, 31 डिसेंबर 2016 रोजी सेना प्रमुख पदी तर, 1 जानेवारी 2020 रोजी त्यांची सीडीएस (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

अनेक पुरस्कारांनी आले होते गौरविण्यात

जनरल रावत यांना लष्करी सेवेदरम्यान अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. यामध्ये परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांचा समावेश आहे.

जॉइंट थिएटर कमांड आणि आयबीजीच्या अनुषंगाने पुढाकार

लष्कराच्या तिन्ही दलांचे एकत्रितपणे असलेले मुख्यालय म्हणजेच 'जॉइंट थिएटर कमांड' त्याचबरोबर सीमावर्ती भागात इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स'ची (आयबीजी) नेमणूक यासाठी जनरल रावत यांचे प्रयत्न सुरू होते. या थिएटर कमांडमुळे तिन्ही दलांमधील साधन, शस्त्र, तंत्रज्ञान यांचा योग्य वापर व्हावा तसेच तिन्ही दलांमध्ये समन्वय स्थापित करणे हा याचा मुख्य उद्देश होता. सध्या अमेरिका आणि चीन सारख्या देशांमध्ये जॉइंट थिएटर कमांड असून भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण आणि जागतिक पातळीवर लष्कराची ताकद वाढविण्याकरिता त्यांनी आयबीजी आणि जॉइंट थिएटर कमांड' च्या निर्मितीचे निर्णय घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.