Voters Day : मतदान कार्ड बनवायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या फंडा

National Voters' Day : घरबसल्या मतदार यादीत आपल्या नावाची नाेंदणी करा.
National Voters' Day
National Voters' DayTeam eSakal
Updated on

सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्यासाठी मतदान कार्ड आवश्यक आहे. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानानुसार, तो अधिकार नागरिकांना वयाची १८ वर्ष पुर्ण झाल्यावर मिळतो. त्यामुळे जर तुमचं वय १८ वर्ष पूर्ण झालं असेल, तर तुम्ही मतदान कार्डसाठी अर्ज करू शकता. मतदानाव्यतिरिक्त, मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून, मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि कर्ज घेण्यासाठी आवश्यक असतं. याशिवाय अनेक सरकारी आणि खासगी योजनांमध्येही मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो.

National Voters' Day
घरबसल्या करा आधार-मतदार कार्ड लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

यापूर्वी मतदान कार्डसाठी अर्ज करण्यासाठी स्थानिक किंवा राष्ट्रीय निवडणुकांची वाट पाहावी लागायची, कारण त्यापूर्वीच नाव नोंदणी करता येत होती. मात्र आता भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे मतदान कार्डसाठी अर्ज करणं आणखी सोपं केलंय.

नोंदणीसाठी काय कराल?

  1. पहिल्यांदा तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर https://eci.gov.in/ जावं लागेल.

  2. राष्ट्रीय मतदार सेवा (Voter Service) वर क्लिक करा.

  3. 'Apply Online for registration of New Voter' वर क्लिक करा.

  4. माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

  5. 'सबमिट' वर क्लिक करा.

  6. सबमिशन केल्यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर तुम्हाला ईमेल मिळेल. या ईमेलमध्ये वैयक्तिक मतदार ओळखपत्र पृष्ठाची लिंक असेल. तुम्‍ही या पृष्‍ठावरून तुमच्‍या मतदार ओळखपत्र अर्जाचा मागोवा घेऊ शकाल. अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र मिळेल.

National Voters' Day
ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? मग चिंता नको, असे मिळवा duplicate

मतदान कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

  1. एक पासपोर्ट साईज फोटो

  2. ओळखीचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा शाळेची मार्कशीट आवश्यक आहे.

  3. रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा युटिलिटी बिल पत्त्याचा पुरावा म्हणून फोन किंवा वीज वापरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.