शिवराज आणि वसुंधरा या दोन मोठ्या चेहेऱ्यांशिवाय भाजप कसे जिंकणार MP आणि Rajastan ?

शिवराज आणि वसुंधरा या दोन मोठ्या चेहेऱ्यांशिवाय भाजप कसे जिंकणार MP आणि Rajastan ?
Updated on

MP आणि Rajastan Vidhansabha : राजस्थान, मध्य प्रदेश या २ विधानसभांचे बिगुल वाजले असून निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष कमला लागले आहेत. यातच आता विजय मिळवण्यासाठी भाजप नवनवीन प्रयोग करत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत भाजप आपले खासदार आणि केंद्रीय मंत्री उतरवत आहे. मात्र दुरीकडे शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे यांना भाजप बाजूला करून नवीन चेहेऱ्यांना संधी देईल असे म्हटले जात आहे. मात्र आता या दोघांशिवाय भाजप नक्की कसे जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मध्य प्रदेशची निवडणूक भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली लढेल असे म्हटले जात आहे. याच बरोबर नरेंद्रसिंग तोमर, प्रल्हादसिंग पटेल, फग्गनसिंग कुलस्ते या केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांना विधानसभेची तिकिटे देऊन भाजपने राज्यात मुख्यमंत्र्यांची कमतरता नसल्याचा संदेश दिला आहे. शिवराजसिंह चौहान यांना केंद्रीय राजकारणात आणले जाईल. असे म्हटले जात आहे.

मात्र यात एक अशी अडचण आहे की, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्यापेक्षा मोठा ओबीसी चेहरा भाजपकडे नाही. प्रल्हाद सिंह पटेल आणि गणेश सिंह हे देखील ओबीसी आहेत पण त्यांचं नेतृत्व राज्यमान्य नाही.अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे हे पुढे येऊ शकतात असे म्हटले जात आहे.

शिवराज आणि वसुंधरा या दोन मोठ्या चेहेऱ्यांशिवाय भाजप कसे जिंकणार MP आणि Rajastan ?
BJP MP: रमेश बिधुरींना भाजपने दिली नवी जबाबदारी; त्यांना बक्षीस मिळालं.. दानिश अलींची टीका

राजस्थानमध्ये भाजपकडे वसुंधरा राजे शिंदे यांच्या व्यतिरिक्त एकही मोठा चेहरा नाही. यामुळे एका टोकापासून ते थेट अखेरच्या टोकापर्यंत राज्यात भाजपला जिंकवू शकेल असा दुसरा चेहरा भाजपकडे नाही. यामुळे वसुंधरा यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालातरी भाजप आपला चेहेरा बनवेल असे म्हटले आहे आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या सर्व प्रयत्नांनंतरही वसुंधरा यांचे राजकीय वजन कमी करण्यात भाजपला यश आले नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळे वसुंधरा राजे यांनी कधीही भाजप हायकमांड आणि राष्ट्रीय नेत्यांचा दबावा पुढे कधीही झुकल्या नाहीत. यामुळेच भाजपच्या नो रिपीट फॉर्म्युल्याला वसुंधरा यांची संमती अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील कोणालातरी भाजप तिकीट देईल असे म्हटले आहे आहे.

शिवराज आणि वसुंधरा या दोन मोठ्या चेहेऱ्यांशिवाय भाजप कसे जिंकणार MP आणि Rajastan ?
BJP Politics : भाजप खासदारांना उतरवणार विधानसभेच्या रिंगणात ! वाचा काय आहे नवा प्लॅन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.