Vande Bharat Railway : 'वंदे भारत'ची चाचणी यशस्वी; हुबळी-मिरज मार्गावर धावली रेल्वे, PM मोदींच्या हस्ते कधी उद्घाटन?

Hubli to Pune Vande Bharat Railway : बेळगावात वंदे भारत रेल्वेची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली आहे.
Hubli to Pune Vande Bharat Railway
Hubli to Pune Vande Bharat Railwayesakal
Updated on
Summary

हुबळी-पुणे एक्स्प्रेसला ८ तास ३० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. हुबळीमधून पहाटे पाच वाजता निघणार आहे.

बेळगाव : हुबळी ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेची (Hubli to Pune Vande Bharat Railway) चाचणी गुरुवारी (ता.१२) हुबळी ते मिरज या दरम्यान घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे हुबळी ते पुणे दरम्यान वंदे भारत रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर दुपारी १२.२५ वाजता रेल्वे पोहचली. नागरिकांत हा कौतूकाचा विषय ठरला होता. रविवारी (ता. १५) या रेल्वेला हिरवे निशान दाखवण्यात येणार असून, सोमवारपासून (ता.१६) ती बेळगावकरांच्या सेवेत असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.