आता काँग्रेस आमदारांकडून कॅश जप्त; रक्कम मोजण्यासाठी मागवल्या मशिन्स

cash seized
cash seized sakal
Updated on

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी शनिवारी झारखंड काँग्रेसच्या 3 आमदारांकडून मोठ्याप्रमाणात रोकड जप्त केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रोख रक्कमेच्या मोजणीसाठी मोजणी यंत्र मागवण्यात आल्या आहेत. (huge cash seized from congress mla news in marathi)

हावडा शहर पोलिसांच्या दक्षिण डीसीपी प्रतीक्षा झाखरिया यांनी सांगितले की, राजेश कछाप, नमन विक्सेल कोंगारी आणि इरफान अन्सारी यांच्याकडून ही रोकड सापडली आहे. तिघेही झारखंड काँग्रेसचे नेते आहेत. प्रतीक्षा झाखरिया यांनी सांगितले की, पोलिसांनी गुप्तचरांकडून यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक वाहन थांबवले. त्या वाहनात झारखंडचे तीन आमदार होते. त्यानंतर कारची तपासणी केली असता त्यात मोठी रोकड आढळून आली.

टीएमसीकडून ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

काँग्रेस आमदारांकडून रोख रक्कम जप्त केल्यानंतर, टीएमसीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ रिट्विट केला. त्यात म्हटलं की, एवढी मोठं रक्कम जप्त होणे धक्कादायक आहे. झारखंडच्या काँग्रेस आमदारांना हावडा येथे थांबवण्यात आले. त्यांच्याकडून मोठी रक्कम जप्त करण्यात आली. ईडी केवळ निवडक लोकांवरच कारवाई करतेय का, असा प्रश्न देखील टीएमसीकडून उपस्थित करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()