Paper Check: पेपर तपासताना झाल्या प्रचंड चुका! शिक्षकांकडून वसूल केले अडीच कोटी रुपये

जेव्हा विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळतात तेव्हा त्यासाठी बऱ्याचदा सर्वस्वी संबंधित विद्यार्थ्यालाच जबाबदार धरलं जातं.
Paper Check
Paper Check
Updated on

अहमदाबाद : विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळतात तेव्हा त्यासाठी बऱ्याचदा सर्वस्वी संबंधित विद्यार्थ्यालाच जबाबदार धरलं जातं. पण अनेक घटना अशाही उघडकीस आल्या आहेत ज्यामध्ये शिक्षकांनी पेपर तपासताना त्याचं नुकसान तसेच गुण देताना घोळ घातल्यानं त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. अशा शिक्षकांकडून गेल्या चार वर्षात शिक्षण मंडळांनी दंडापोटी तब्बल २.३४ कोटी रुपये वसूल केले आहेत. (Huge mistakes made while checking the paper 2.3 crores of repees recovered from teachers)

Paper Check
Haryana School Bus Accident: चालक नशेत धुंद, स्थानिकांनी अडवलं चावीही काढली पण...; 6 विद्यार्थांचा जीव घेणाऱ्या अपघातावेळी काय घडलं वाचा?

सन २०१८ आणि २०२३ या काळात सुमारे १८,००० शिक्षकांना पेपर तपासताना चुका केल्यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. पण कोविडच्या काळात सन २०२० आणि २०२१ मध्ये शाळा कॉलेज बंद असल्यानं या काळात कारवाई झालेली नाही. या चुकांसाठी सर्व शिक्षकांना मिळून २ कोटी ३४ लाख ४७ हजार २१३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये प्रत्येक चुकीसाठी त्यांना १०० रुपये दंड लावला जातो. शिक्षकांनी हा दंड रोख स्वरुपात, डीडी किंवा चेकच्या माध्यमातून भरावा लागतो. गुजरातच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डानं हा दंड वसूल केला आहे. (Marathi Tajya Batmya)

Paper Check
Sandeshkhali eMail: संदेशखाली प्रकरणी CBIनं तयार केला विशेष ईमेल; पीडितांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन

याप्रकरणी बोलताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जवळपास ३० टक्के चुका या शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेच्या विविध भागांच्या गुणांची बेरीज करताना केलेल्या असतात. यामध्ये सर्वाधिक दंड हा गणित आणि विज्ञानाच्या पेपरमध्ये झालेल्या आहेत. या सातत्यानं चुका होत असून सुमारे १५ टक्के इतक्या आहेत. (Latest Marathi News)

Paper Check
Haryana School Bus Accident: 'काका, प्लीज हळू चालवा', मुले ड्रायव्हरला सांगत होती पण...हरियाणातील स्कूल बस अपघातावेळी काय घडलं?

विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर या चुका उघडकीस येतात. मूल्यांकन प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश होतो. एक म्हणजे शिक्षकांचे प्रारंभिक मूल्यांकन त्यानंतर मॉडरेटरकडून पडताळणी. दरम्यान, यावर्षी 75,000 हून अधिक शिक्षकांनी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांसाठी अंदाजे 81 लाख उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()