Human Development Index: भारतातील लोकांचे आयुर्मान अन् उत्पन्न वाढले पण परिस्थिती अजूनही चिंताजनक

Human Development Index: मानव विकासाच्या स्थितीमुळे भारत मध्यम मानव विकास श्रेणीत आला आहे. याशिवाय, भारताने लैंगिक असमानता निर्देशांकातही प्रगती दर्शवली आहे.
Human Development Index
Human Development Indexesakal
Updated on

Human Development Index: भारतातील लोकांचे सरासरी वय आता वाढले आहे. आता देशातील लोकांचे सरासरी वय ६७.७ वर्षे झाले आहे, जे आतापर्यंत ६२.७ वर्षे होते. याशिवाय भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्नही वाढले आहे. देशातील दरडोई उत्पन्न ६९५१ डॉलर पर्यंत वाढले आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकात भारत १९३ देशांपैकी १३४ व्या क्रमांकावर आहे.

मानव विकासाच्या स्थितीमुळे भारत मध्यम मानव विकास श्रेणीत आला आहे. याशिवाय, भारताने लैंगिक असमानता निर्देशांकातही प्रगती दर्शवली आहे.

मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. या निर्देशांकात भारताच्या स्थानात एक क्रमांकाची प्रगती झाली आहे. मात्र २०२१ मध्ये जगातील १९१ देशांपैकी १३५ व्या क्रमांकावर असलेला भारत २०२२ मध्ये १९३ देशांपैकी १३४ व्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) अहवालात भारतासह सर्व देशांची यासंदर्भातील आकडेवारी उघड झाली आहे.

भारताचा मानव विकास निर्देशांक मूल्य २०२१ मधील ०.६३३ च्या तुलनेत २०२२ मध्ये ०.६४४ असा किंचित प्रमाणात सुधारला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाचा ‘ब्रेकिंग द ग्रिडलॉक: रीइमेजिनिंग कोऑपरेशन इन ए पोलराइज्ड वर्ल्ड’ शीर्षकाचा हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. 

Human Development Index
Sudha Murthy: राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर सुधा मूर्ती पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या, शाळेत...

भारताने लैंगिक असमानता निर्देशांकातही सुधारणा केली आहे. मानव विकास निर्देशांकात भारताने एकाच स्थानाने प्रगती केली असली तरी लैंगिक असमानता निर्देशांकात मात्र १४ स्थानांनी प्रगती केली आहे. ते २०२१ मध्ये १२२ वरून २०२२ मध्ये १०८ वर पोचले. जीआयआय प्रामुख्याने प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण व श्रमिकांची बाजारपेठ या तीन घटकांवर मोजला जातो. भारताचा जीआयआय जागतिक सरासरी ०.४६२ च्या तुलनेत चांगला असून तो ०.४३७ इतका आहे.

देशात श्रमशक्तीच्या सहभाग दरात भारतातील दरी मोठी आहे. यात महिला (२८.३ टक्के) व पुरुष (७६.१ टक्के) या तब्बल ४७.८ टक्क्यांचे अंतर आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान एकाच क्रमांकाने सुधारले असले तरी १९९० पासून आत्तापर्यंत देशाने लक्षणीय प्रगती केली आहे. १९९०च्या तुलनेत आयुर्मान ९.१ वर्षांनी वाढले आहे. (Latest Marathi News)

शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे ३.८ वर्षांनी वाढली आहेत. त्यामुळे, १९९० ते २०२२ दरम्यान मानव विकासाच्या बाबतीत भारत मध्यम श्रेणीत आहे. भारताने २०२२ मध्ये आयुष्यमान, शिक्षण व दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न आदी सर्व मानव विकास निर्देशांकात सुधारणा नोंदविली आहे. एकीकडे श्रीमंत देश विक्रमी मानव विकास करत असताना दुसरीकडे गरीब देशांतील निम्मे देश आपल्या प्रगतीच्या पूर्व-संकट स्तरापेक्षा खालील क्रमांकावर आहेत.

Human Development Index
Nilesh Lanke: निलेश लंकेंना मदत लागल्यास आम्ही तयार; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.