फरार हुर्रियत नेता अल्‍ताफ अहमद भट्टला पाकिस्तानात अटक!

भारतातील अनेक दहशतवादी कटांमध्ये हात असणारा फरार हुर्रियत नेता अल्ताफ अहमद भट (Altaf Ahmed Bhat) याला पाकिस्तानात (Pakistan) अटक (Arrest) करण्यात आली आहे.
Altaf Ahmed Bhat has been Arrested in Pakistan
Altaf Ahmed Bhat has been Arrested in PakistanSakal
Updated on

भारतातील अनेक दहशतवादी कटांमध्ये हात असणारा फरार हुर्रियत नेता अल्ताफ अहमद भट (Altaf Ahmed Bhat) याला पाकिस्तानात अटक (Arrest) करण्यात आली आहे. सुमारे 140 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी भट्ट आणि त्यांच्या 16 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. रावळपिंडीतील एका सहकारी गृहनिर्माण प्रकल्पात हेराफेरीप्रकरणी संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्य काश्मीरमधील (Kashmir) बडगाम जिल्ह्यातील रहिवासी असलेला अल्ताफ हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ आणि त्याचा मोठा भाऊ जफर अकबर भट यांनी 1993 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते.

Altaf Ahmed Bhat has been Arrested in Pakistan
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी

अल्ताफ 1995 मध्ये पाकिस्तानात पळून गेला तर जफरने गेल्या वर्षी आत्मसमर्पण केले. तेव्हापासून अल्ताफ कराचीमध्ये राहून आयएसआयच्या (ISI) आश्रयाखाली काश्मीरमधील दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत आहे. अल्ताफ हा रावळपिंडीतील हुर्रियतच्या पाकिस्तान चॅप्टरचा महत्त्वाचा सदस्य मानला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वोच्च न्यायालयाने जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आयएसआयचा हस्तक 'अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

Altaf Ahmed Bhat has been Arrested in Pakistan
कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ४३९ दहशतवादी ठार; केंद्राने दिली माहिती

कोण आहे अल्ताफ अहमद भट्ट?

अल्ताफ अहमद भट्ट हा प्रमुख काश्मिरी फुटीरतावादी म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा (APHC) प्रतिनिधी म्हणून काम करतो. 1995 मध्ये तो पाकिस्तानात पळून गेला. तेव्हापासून त्याने भारतविरोधी कार्यात सहभागी झाला. हिजबुलचा सक्रिय सदस्य असताना तो 'तुफैल' या सांकेतिक नावाने काम करत असे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ हा ISI आणि जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा हस्तक बनला होता. अनेक श्रीमंत काश्मिरींना पाकिस्तानच्या व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये जागा मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने भरपूर दलाली खाल्ली.

जफर अकबर भट्ट पोलिसांच्या ताब्यात आहे

J&K च्या विशेष तपास संस्थेने (SIA) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अल्ताफचा भाऊ जफरसह नऊ संशयितांना अटक केली होती. पाकिस्तानी वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS च्या जागांमध्ये हाय-प्रोफाइल काश्मिरींच्या मुलांना प्रवेश देण्याच्या घोटाळा उघडकीस आला होता. हुर्रियतमध्येच हे रॅकेट सुरू होते. त्यानंतर SIA ने अल्लाफला दहशतवाद्यांना निधी पुरवणारा म्हणून घोषित केले. हुर्रियत अशा काश्मिरी मुलांची निवड करत असे ज्यांना दिशाभूल करून दहशतवादाकडे नेले जाऊ शकते. 2018 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले आणि त्यानंतर काश्मीरमधील दहशतवादासाठी निधीच्या स्रोतांची मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू झाली.

Altaf Ahmed Bhat has been Arrested in Pakistan
पाकिस्तानचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मोहंमद खुरासनी ठार

या मार्गातून कमावलेला पैसा दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या विविध गटांकडे वळवण्यात आला होता, असंही एसआयएने गेल्या वर्षी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून हुर्रियतच्या कार्यक्रमाचा फायदा घेण्यासाठी अनेक कुटुंबांनी हुर्रियत नेत्यांशी संपर्क साधला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना मोफत एमबीबीएस आणि इंजिनीअरिंगच्या जागा उपलब्ध करून देऊन दहशतवादाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता.

अल्ताफ पाकिस्तानात पळून गेल्यानंतर जफर हिजबुल कमांडर अब्दुल माजिद डारच्या कॅम्पमध्ये सामील झाला. सय्यद सलाहुद्दीनच्या गुंडांनी २००३ मध्ये दार आणि त्याच्या अनेक साथीदारांना ठार केलं होतं. या दोघांचा भाऊ अब्दुल गनी भट्ट रिअल इस्टेट एजंट होता. हिजबुलच्या या परस्पर संघर्षात तो मारला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()