उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका कॅब चालकाने एका मुलासह विष प्राशन करून आत्महत्या केली. पत्नी घरी न आल्याने कॅब चालक चिंतेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओही बनवला होता. व्हिडिओमध्ये मृताने आपल्या पत्नीला आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. त्याने पत्नीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.