हैदराबाद: एका उच्चशिक्षित युवकाने चोरीचा बनावट डाव रचला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर सत्य समोर आले. पण, कारण समजल्यावर पोलिसांनाही वाईट वाटले असले तरी गुन्हा दाखल करावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. अच्ची रेड्डी हा युवक एमबीए पदवीधर आहे. तो एका पेपर मिलमध्ये अकाउंटेंट कम कलेक्शन बॉयचे काम करत होतो. 25 मे रोजी त्याने वेगवेगळ्या एजेंट्सकडून 8.51 लाख रुपये जमा केले. यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन सांगितले की, काही व्यक्तींनी मला मारहाण करून माझ्याकडील रक्कम घेऊन पसार झाले. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तो चौकशीच्या जाळ्यात अडकत गेला. अखेर सत्य समोर आले आणि पोलिसांनी रक्कम जप्त केली. याबाबात पोलिस पुढील तपास करत आहेत.
चौकशीदरम्यान रेड्डीने सांगितले की, 'माझी प्रेयसी गंभीर आजारी आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे पैसे चोरीचा बनावट डाव रचला.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.