टेलर पतीनं आवडीचा ब्लाउज शिवला नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

Vijayalakshmi
Vijayalakshmiesakal
Updated on
Summary

श्रीनिवासनं पत्नीसाठी ब्लाउज शिवला होता, पण तो तिला आवडला नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हैदराबाद : हैदराबादच्या (Hyderabad) अंबरपेठ येथे राहणाऱ्या विजयालक्ष्मी (वय 35) नावाच्या महिलेनं ब्लाउजवरून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आत्महत्या केलीय. श्रीनिवास नावाच्या शिंपीनं (Tailor) विजयालक्ष्मीसाठी ब्लाउज शिवला होता, पण विजयालक्ष्मीला तो आवडला नाही.

विजयालक्ष्मीनं (Vijayalakshmi) ब्लाउज उघडून पुन्हा शिवायला सांगितला. श्रीनिवासनं वेळेची कमतरता सांगून नकार दिला. काही तासांनंतर बंद खोलीत विजयालक्ष्मीचा मृतदेह सापडला. ही घटना गोलंका तिरुमला नगर येथील आहे. श्रीनिवास साड्या आणि ब्लाउज विकतो आणि घरी शिवणकाम करतो. विजयालक्ष्मीला दोन मुलं आहेत, जी शाळेत जातात.

शनिवारी श्रीनिवासनं पत्नीसाठी ब्लाउज शिवला होता, पण तो तिला आवडला नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मुलं शाळेत गेल्यानंतर पतीनं रागाच्याभरात स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतलं. श्रीनिवास कामानिमित्त घराबाहेर पडला. मुलं शाळेतून परतल्यावर घराचा दरवाजा वाजवला. मात्र, दरवाजा उघडला नाही. खोलीबाहेर उभ्या असलेल्या मुलांनी आईला हाक मारली, पण काहीच उत्तर आलं नाही. यानंतर मुलांनी वडिलांना माहिती दिलीय.

Vijayalakshmi
कडक सॅल्यूट! भावाच्या लग्नात उरलेलं 'अन्न' गोरगरीबांना केलं 'दान'

मुलांकडून माहिती घेतल्यानंतर, श्रीनिवास घरी आला. अनेकदा फोन करूनही दरवाजा उघडला नाही. बराच वेळ दरवाजा न उघडल्यानं त्यांनी तो तोडला. आत विजयालक्ष्मीचा मृतदेह होता. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यानं (Hyderabad Police) महिलेच्या पतीचा जबाब घेतला. यासोबतच त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडून महिला आणि तिच्या पतीची माहितीही गोळा केलीय. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()