''जज साहेब मी जिवंत आहे'', स्वतःच्याच हत्या प्रकरणात चिमुकल्याची साक्ष; कोर्ट अचंबित

Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातल्या पीलीभीतमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खूनाच्या प्रकरणात ११ वर्षांच्या चिमुकल्याने कोर्टात धाव घेत मी जिवंत असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे त्याच्याच हत्येचं प्रकरण कोर्टामध्ये सुरु होतं.

चित्रपटामध्ये शोभावा असा प्रसंग घडला आहे. अनेकदा पोलिस बळजबरीने गुन्हा कबुल करायला लावून कुणालाही आरोपी बनवतात. असाच पोलसांचा कारनामा उत्तर प्रदेशातल्या पीलीभीतमधून पुढे आलाय. न्यूरिया ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रफियापूर गावात ११ वर्षांचा एक मुलगा आपल्या आजोळी राहातो. पोलिसांनी त्यालाय मृत झाल्याचं दाखवून आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला होता.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ११ वर्षांचा मुलाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी कोर्टाने गृह विभागाचे सचिव, पोलिस अधीक्षक, न्यूरिया ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांना नोटीस पाठवली आहे. तसेच प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण २०१० मधील आहे. रफियापूरचे चरम सिंह यांनी आपली मुलगी मीना हिचं लग्न बरहा येथील भानुप्रकाश याच्यासोबत केलं होतं. त्यांच्या मुलाचं नाव अभय सिंह आहे. २०१३ मध्ये मीनाचा मृत्यू झाला. भानुप्रकाश आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात मीनाच्या कुटुंबियांनी हुंडाबळीची केस दाखल केली होती.

Supreme Court
भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचेही होणार 'सेन्सॉर'; नियम तयार, हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक!

त्यानंतर मीनाचे कुटुंबीय अभयला ननिहाल येथे घेऊन गेले. २०१५ मध्ये भानुप्रकाशने गार्डियन वॉर्ड एक्टनुसार मुलाचा ताबा मिळवण्यासाठी केस दाखल केली. त्यामध्ये १२ जानेवारी २०२१ रोजी कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी भानुप्रकाशच्या बाजूने निकाल दिला.

तर दुसरीकडे मुलाचे आजोबा चरम सिंह यांनी या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. भानुप्रकाश याने कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एक अपिल केलं. त्यावर मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टाने न्यूरिया पोलिसांना आजोबांकडून मुलगा माघारी आणण्याचे आदेश दिले. परंतु हायकोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने मुलाच्या आजोळच्या लोकांनी मुलाला देण्यास नकार दिला.

त्यानंतर भानुप्रकाशने कोर्टाच्या निकालाआधारे सीआपीसी कलम १५६ (३) अंतर्गत २४ जुलै २०२३ रोजी चरम सिंह आणि अन्य लोकांविरोधात अभय सिंह याला मारणे, त्याला धमकी देणे आदी आरोप केले. त्यावर न्यूरिया पोलिसांनी चरम सिंह आणि इतरांविरुद्ध कलम ३०२, ५०४, ५०६ नुसार एफआयआर दाखल केली. वास्तविक अभय सिंह जिवंत आहे.

Supreme Court
Mid Day Meal: सरकारी शाळेत लसीकरण अन् मध्यान्ह भोजनं; जेवणानतंर दुसरीतल्या विद्यार्थ्यीनीचा मृत्यू!

एफआयआरनंतर पोलिसांनी कार्यवाही सुरु केली. त्यानंतर ११ वर्षांचा मुलगा हायकोर्टात पोहोचला. त्याने याचिका दाखल करुन सांगितलं की, त्याच्या वडिलांनी भानुप्रकाश यांनी दाखल केलेली एफआयआर खोटी असून मी जिवंत आहे. परंतु हायकोर्टाने याचिका फेटाळली. त्यामुळे मुलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.