जितिन प्रसाद यांनी जे केलं त्याविरोधात मी नाही - कपिल सिब्बल

National News Congress Kapil Sibbal BJP Narendra Modi
National News Congress Kapil Sibbal BJP Narendra Modi
Updated on
Summary

जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर कपिल सिब्बल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हणलं की, हे 'प्रसाद' राजकारण आहे. अशा प्रकाराने जनतेचा राजकारणावरचा विश्वास उडेल.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानं राजकीय वाातवरण तापलं आहे. आता काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच काँग्रेसच्या जी23 नेत्यांनी याबाबत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहून पक्षांतर्गत सुधारणांची गरज असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हेसुद्धा जी 23 नेत्यांपैकी एक आहेत.

जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर कपिल सिब्बल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हणलं की, हे 'प्रसाद' राजकारण आहे. अशा प्रकाराने जनतेचा राजकारणावरचा विश्वास उडेल. कपिल सिब्बल यांना तुम्ही भाजपमध्ये जाणार का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मी मरेपर्यंत तरी काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेसचा खरा कार्यकर्ता कधीच असा निर्णय घेणार नाही.

National News Congress Kapil Sibbal BJP Narendra Modi
'तीस दिन में पैसा डबल बाबूभैया'; पाच लाख भारतीयांना 150 कोटींचा चूना!

जितिन प्रसाद यांनी जे केलं त्याच्या विरोधात मी नाही. त्यामागे काहीतरी कारण असेल जे त्यांनी सांगितलेलं नाही. पण भाजपमध्ये प्रवेश करणं हे समजलं नाही. यातून हेच दिसतं की आया राम गया राम संस्कृतीचा प्रवास आता 'प्रसाद' पॉलिटिक्सकडे वळला आहे. जिथं प्रसाद मिळतो त्या पक्षात जातात असाही टोला कपिल सिब्बल यांनी लगावला.

पक्षनेतृत्वाने काय केलं किंवा काय नाही यावर मी काहीच बोलणार नाही. मात्र आपण राजकारणाच्या अशा टप्प्यात पोहोचलो की इथं विचारधारेवर आधारीत निर्णय घेतले जात नाहीत. आता ज्याला मी प्रसादा राम राजकारण म्हणतोय त्यानुसार असे निर्णय़ घेण्यात य़ेत असल्याचंही कपिल सिब्बल म्हणाले.

National News Congress Kapil Sibbal BJP Narendra Modi
काँग्रेसची 'चौकट' मोडली; राहुल गांधींसमोर काय आहे संकट?

आम्ही पश्चिम बंगालमध्ये असं घडताना पाहिलं आहे. अचानक लोक निघून जातात कारण त्यांना वाटतं की भाजप यशस्वी होणार आहे. तुम्हाला एका विचारधारेनुसार निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, तर तुमच्या मनात असं असतं की मला काही मिळेल का? मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही असंच झाल्याचं कपिल सिब्बल म्हणाले.

मला खात्री आहे की पक्षनेतृत्वाला नक्की समस्या काय आहे हे माहिती आहे. आणि मला आशा आहे की, ते ऐकून घेतील. ऐकून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तुम्ही ऐकलं नाहीत तर वाईट काळाचा सामना करावा लागेल असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.