काँग्रेस पुढील निवडणुकीत 300 जागा जिंकणं अवघडच: गुलाम नबी आझाद

gulam nabi azad
gulam nabi azad
Updated on

जम्मू: 2024 च्या लोकसभा निवडणुका अद्याप दूर असल्या तरीही त्याबाबतच्या चर्चा मात्र, आतापासूनच सुरु आहेत. एकीकडे काँग्रेस वगळता तिसरी आघाडी होईल का, अशा काही शक्यतांवर चर्चा तर दुसरीकडे काँग्रेससोबतच मात्र, भाजपला कसं हरवलं जाईल, याच्या चर्चा विरोधकांच्या संदर्भात केल्या जातात. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस किती जागा प्राप्त करेल, याबाबत नसलं तरी किती जागा प्राप्त करु शकणार नाही, याबाबतचं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केलंय.

gulam nabi azad
राज्याला 'जोवाड' चक्रीवादळाचा धोका, IMD कडून सतर्कतेचा इशारा

त्यांना म्हटलंय की, त्यांना असं वाटत नाही की पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच 2024 मध्ये काँग्रेसला 300 जागा प्राप्त करता येणार नाहीत. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. तसेच त्यांनी 370 कलमावर देखील महत्त्वाची विधाने केली आहेत.

कलम 370 बाबत म्हणाले...

गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय की, कुणी जर असं म्हणत असेल की आम्ही 370 बाबत बोललो नाही, तर ते चुकीचंय. कारण संसदेत तर मी एकटाच याबाबत बोलतो आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे फक्त सुप्रीम कोर्ट आणि ज्यांनी हे विधेयक आणलं तो भाजप पक्षच कलम 370 पुन्हा आणू शकतं. ज्याअर्थी भाजपशासित केंद्र सरकारने कलम 370 रद्द केलंय त्याअर्थी ते पुन्हा हे कलम आणणार नाहीत.

gulam nabi azad
कोल्हापूर - काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

म्हणून मी बोलत नाही

370 चा उल्लेख करत आझाद यांनी म्हटलं की, मी यासाठी 370 बाबत बोलत नाही कारण, एकतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाशिवाय जर कुणी याबाबत काही करु शकत असेल तर ते सध्याचं सरकारचं करु शकतं. मात्र, सध्याच्या सरकारनेच हे कलम रद्द केलंय, त्यामुळे ते पुन्हा हे कलम आणणं शक्य नाहीये. दुसरीकडे आमचे 300 लोक कधी खासदार बनतील? त्यामुळे मी हे वचन देऊ शकत नाही की, 2024 मध्ये काँग्रेसचे 300 खासदार निवडून येतील. जर आले तर मी स्वागतच करेन. ईश्वराच्या कृपेने 300 खासदार निवडून येवोत. मात्र, मला तरी असं दिसत नाही. त्यामुळे मी चुकीचं आश्वासन देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.