देशात कोरोनाची चौथी लाट नाही, डॉ. गंगाखेडकरांनी स्पष्टच सांगितलं

दिल्लीसह पाच राज्यातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत काहीशी वाढ दिसू लागली आहे.
Corona Test
Corona Testsakal
Updated on

मुंबई : एकीकडे देशभरातील कोराना रूग्णसंख्या कमी झाल्याने अनेक ठिकाणचे कोरोना निर्बंध (Corona Restriction) जवळपास मागे घेण्यात आले आहे. तर, दुसरीकडे दिल्लीसह पाच राज्यातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत काहीशी वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा मास्क (Mask) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये ICMR चे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर (Raman Gangakhedka) यांनी अतिशय महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. (Dr. Raman Gangakhedkar On Corona New Wave)

गंगाखेडकर म्हणाले की, देशातील काही भागांमध्ये कोरोना बाधितांची वाढती रूग्णसंख्या कोरोनाची चौथी लाट असल्याचे आतासध्याच्या आकडेवारीवरून तरी वाटत नाहीये. संपूर्ण जगाने BA.2 व्हेरिएंटचा जगभरातील लोकांवर परिणाम होत असल्याचे पाहिले आहे. मात्र, त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरिएंट समोर आलेला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Corona New Variant)

परंतु, जे वृद्ध आहेत, ज्यांनी लस (Corona Vaccination) घेतलेली नाही, ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांनी सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करण आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मास्कचा वापर ऐच्छिक केल्यामुळे नागरिकांना महामारी संपल्याचे वाटू लागले आहे. मात्र, अद्याप कोरोना कायमचा संपलेला नसून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचेही गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले.

Corona Test
Honda Goldwing : कार पाठोपाठ एअरबॅग असलेली बाईक आली बाजारात, जाणून घ्या किंमत

कोरोना वाढतोय, केंद्राचा पत्रातून राज्यांना इशारा

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात लिहलंय की, राज्यांनी कोरोनाबाबत आवश्यक ते निर्णय घ्यावेत. सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा आणि ठराविक राज्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

मागील काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर राज्यांत कोरोना रुग्ण झपाट्याने पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पत्र लिहित, आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.