'अपमानित झाल्यासारखं वाटतंय'; राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया

amrindar singh
amrindar singh
Updated on

चंदीगढ: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. पंजाबचे ते दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात सातत्याने धुसफूस चालू आहे. अंतिमत: त्याची परिणीती आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यात झाली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला आहे. आपल्या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय की, ज्या प्रकारे बोलणं झालं त्यावरून मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आहे. आज सकाळी मी काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोललो आहे आणि मी त्यांना सांगितलंय की आज मी राजीनामा देतो आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा याप्रकारे घडतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

amrindar singh
पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

पुढे ते म्हणाले की, पार्टी हाय कमांडला ज्याच्यावर विश्वास आहे, त्यांना पंजाबचा मुख्यमंत्री करावं. मी काँग्रेस पार्टीमध्येच आहे. मी माझ्या समर्थकांशी सल्लामसलत करेन आणि भविष्यातील माझा कृतीकार्यक्रम ठरवेन.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीआधी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची निवासस्थानी बैठक घेतली होती. चंदिगढमधील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांच्या बाजूने असलेल्या आमदारांनी उपस्थिती लावली होती. तसंच सायंकाळी त्यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आता सुनील जाखड, सुखजिंदर रंधावा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.