मला कोरोना झाल्याचं समजताच PM मोदींनी फोन केला, अन्..; सरन्यायाधीशांनी सांगितली आठवण

PM Modi story told by the Chief Justice DY chandrachud: जेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यावेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता असं त्यांनी सांगितलं.
DY chandrachud pm modi
DY chandrachud pm modiesakal
Updated on

नवी दिल्ली- भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतरची एक आठवण सांगितली आहे. जेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यावेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी माझी विचारपूस केली होती, मला औषधं देखील पाठवले, असं चंद्रचूड म्हणाले आहेत. गुरुवारी दिल्लीमध्ये त्यांनी AYUSH वेलनेस सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, मला कोरोनाची लागण झाली तेव्हा मी AYUSH सोबत जोडला गेलो होतो. माझ्यावर कोरोना विषाणूचा वाईट परिणाम झाला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा मला फोन आला. ते म्हणाले की, मला कळालं की तुम्हाला कोरोना झाला आहे. मी अपेक्षा करतो की सर्वकाही ठीक होईल. तुमची तब्येत ठीक नाही, पण आपण सर्वकाही ठीक करु. (I got Corona PM Narendra Modi called me and send medicine A story told by the Chief Justice dy chandrachud)

DY chandrachud pm modi
Pre Marital Disease Divorce: पत्नीचा डावा डोळा गाढ झोपेतही उघडा, घटस्फोटासाठी पतीची न्यायालयात धाव, कोर्ट म्हणालं....

पंतप्रधान मोदी यांनी एका वैद्यची माहिती दिली ते AYUSH चे सचिव देखील होते. त्यांच्यासोबत माझं बोलणं करुन देण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी औषधी देखील पाठवली, असं चंद्रचूड म्हणाले. कोरोना झाला असताना मी AYUSH ची औषधं घेतली. जेव्हा पुन्हा दोनवेळा मला या विषाणूने गाठले तेव्हा मी अॅलोपॅथी ओषधं घेतल्या नाहीत, असंही ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश, त्यांचे कुटुंब आणि कोर्टातील २ हजार कर्मचारी यांची मला चिंता होती. कारण त्या सर्वांना न्यायाधीशांसारखी सुविधा मिळत नाही. त्यांच्या सर्वांना चांगले उपचार मिळावेत अशी माझी इच्छा होती, असं सरन्यायाधीश म्हणाले. चंद्रचूड यांनी यावेळी सर्बानंद सोनोवाल यांचे विशेष आभार मानले.

DY chandrachud pm modi
भारताचे सुप्रीम कोर्ट हे 'लोकांचे न्यायालय...CJI चंद्रचूड यांनी अमेरिकेच्या SC शी केली तुलना

२०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीचं संकट देशावरच नाही तर जगावर वर्चस्व गाजवत होतं. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. २२ मार्च २०२० मध्ये पंतप्रधान मोदी यांनी कर्फ्यु घोषित केला, त्यानंतर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीमुळे देशभरात ५ लाख ३३ हजारांपेक्षा अधिक लोकांना मृत्यू झालाय. सध्या कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()