'मी माझा कायमचा राजीनामा सोनिया गांधींकडं देऊन ठेवलाय'

Sonia Gandhi Ashok Gehlot
Sonia Gandhi Ashok Gehlotesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानं राजस्थानात राजकीय खळबळ उडालीय.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुका (Rajasthan Assembly Election) वर्षभरानंतर होत आहेत. आतापासून राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपमध्ये (BJP) अंतर्गत कलहाच्या बातम्या जोर धरत असताना काँग्रेसमध्येही (Congress) गटबाजी सुरूय. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या एका वक्तव्यानं राजस्थानमध्ये राजकीय खळबळ उडालीय.

माध्यमांशी बोलताना गेहलोत म्हणाले, मी माझा कायमचा राजीनामा सोनिया गांधींकडं (Sonia Gandhi) देऊन ठेवलाय. आता या एका वक्तव्यानं सट्टाबाजारलाही चांगलाच वाव मिळालाय. दरम्यान, अलीकडेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिन पायलट (Sachin Pilot) यांची भेट घेतली होती. त्यामुळं या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

Sonia Gandhi Ashok Gehlot
समान नागरी कायद्याबाबत अमित शहांचं मोठं विधान; म्हणाले, जे काही राहिलंय ते..

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या रणनीतीनुसार, अशोक गेहलोत हे बिगर गांधी घराण्यातील काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात किंवा निवडणुकीचे कामकाज सांभाळणारे उपाध्यक्ष होऊ शकतात, अशीही चर्चा सुरू झालीय. तसं झाल्यास सचिन पायलट यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत माध्यमांशी संवाद साधत होते. या चर्चेदरम्यान त्यांनी नमूद केलं की, माझ्या राजीनाम्याबाबत वेळोवेळी मीडियामध्ये बातम्या येत आहेत. मात्र, मी माझा राजीनामा कधीच सोनिया गांधींकडं देऊन ठेवलाय. कोणताही निर्णय घेण्यास मी समर्थ आहे. परंतु, कोणीही अफवांना वाव देऊ नका, अशी सूचनाही त्यांनी केलीय.

Sonia Gandhi Ashok Gehlot
शरद पवारांबरोबर मतभेद, मात्र ते जातीयवादी नाहीत : राजू शेट्टी

राजस्थानच्या राजकारणात नेतृत्व बदलानं जोर धरलाय. पायलट गटाचे नेतेही सातत्यानं असा दावा करत आहेत. गुरूवारी सचिन पायलट यांनीही यावर चर्चा करत असल्याचं सांगितलं. परंतु, अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी घेतील, असं ते म्हणाले. 2023 मध्ये राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.