भारतातून पळून आलो नाही; चोक्सीनं सांगितलं देश सोडण्याचं कारण

२०१७मध्येच चोक्सीने अँटीग्वा आणि बरमुडाची नागरिकता घेतली होती. त्यानंतर चोक्सी कधीच भारतात आला नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडीने चोक्सीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
Mehul Choksi
Mehul ChoksiGoogle file photo
Updated on
Summary

२०१७मध्येच चोक्सीने अँटीग्वा आणि बरमुडाची नागरिकता घेतली होती. त्यानंतर चोक्सी कधीच भारतात आला नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडीने चोक्सीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी आणि डोमिनिका (Dominica) येथे प्रत्यर्पणाच्या केसचा सामना करणारा हिरा व्यापारी मेहुल चोक्सीने (Mehul Choksi) मी भारतातून पळून आलो नाही, असे वक्तव्य केलं आहे. चोक्सीच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. चोक्सीने भारतीय एजन्सींना मुलाखत घेण्याचे आमंत्रण देताना म्हटले आहे की, 'मी भारतीय कायद्याचे पालन करणारा नागरिक असून फक्त उपचारांसाठी देश सोडला होता, मी भारतातून पळून आलो नाही, मी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे.'' (I Left India for Treatment in US says Choksi to Dominica HC)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ६२ वर्षीय चोक्सीने डोमिनिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रतिज्ञापत्रात चोक्सीने म्हटले आहे की, "मी भारतीय कायद्यांना घाबरून पळून आलो नाहीय. जेव्हा मी उपचारा घेण्यासाठी अमेरिकेत आलो होतो, तेव्हा माझ्याविरोधात कोणतंही वॉरंट जारी झालं नव्हतं. त्यामुळे अधिकाऱ्यांना माझी मुलाखत घेण्यास आणि कोणत्याही चौकशीसंदर्भात कोणतेही प्रश्न विचारण्यास सांगितले आहे. सध्या मेहुल चोक्सी डोमिनिकामधील तुरुंगात आहे. २३ मे रोजी तो अँटीग्वा आणि बरमुडामधून गायब झाला होता. त्यामुळे इंटरपोलने त्याच्याविरोधात यलो नोटीस जारी केली होती. त्याअंतर्गत डोमिनिकाममध्ये त्याला अटक करण्यात आली. आता भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

Mehul Choksi
जम्मू-काश्मीर : पुलवामात पोलिसांवर दहशतवादी हल्ला; सात जखमी

दरम्यान, जानेवारी २०१८ मध्ये चोक्सीने भारत सोडला होता. १३ हजार ५०० कोटींचा पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी चोक्सी देश सोडून गेला होता. आणि तेव्हापासून तो अँटिग्वामध्ये राहत होता. २०१७मध्येच चोक्सीने अँटीग्वा आणि बरमुडाची नागरिकता घेतली होती. त्यानंतर चोक्सी कधीच भारतात आला नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडीने चोक्सीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

डोमिनिका उच्च न्यायालयाने ३ जून रोजी प्रत्यार्पणाविषयी सुनावणीला स्थगिती दिली. त्यामुळे चोक्सीला आणण्यासाठी गेलेल्या पथकाला रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागले. सीबीआयच्या उप महानिरीक्षक शारदा राऊत या पथकाचे नेतृत्व करत होत्या.

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()