‘भगवान महादेवाचा अपमान मला सहन झाला नाही. रागाच्या भरात काही गोष्टी बोलल्या. मी माझे शब्द परत घेते’, असे ट्विट भाजपमधून निलंबित झाल्यानंतर राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) म्हणाल्या. (Nupur Sharma said I take back my words)
गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर चर्चेत सहभागी झाले होते. जिथे माझे आराध्य भगवान शिवजी यांचा दररोज अपमान केला जात होता. ते शिवलिंग नसून कारंजे आहे, असे माझ्यासमोर बोलले जात होते. दिल्लीच्या प्रत्येक फुटपाथवर अनेक शिवलिंगे दिसतात, जाऊन त्याची पूजा करा, असे म्हटले जात होते, असेही ट्विटमध्ये (Tweet) नूपुर शर्मा (Nupur Sharma) म्हणाल्या.
महादेव शिवजींचा अशा प्रकारे वारंवार माझ्यासमोर केलेला अपमान सहन होत नव्हता. मी रागाच्या भरात काही गोष्टी बोलल्या. माझ्या बोलण्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर माझे शब्द मागे घेते. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता, असेही नूपुर शर्मा यांनी ट्विटमध्ये (Tweet) लिहिले आहे.
आम्ही सर्व धर्मांच्या श्रद्धेचा आदर करतो. परंतु, प्रश्न फक्त त्या मानसिकतेचा होता जे आमच्या देवतांवर अपमानास्पद टिप्पणी करून द्वेष पसरवतात. मी त्याला फक्त एक प्रश्न विचारला. याचा अर्थ आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात आहोत असा होत नाही, असे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नवीन कुमार जिंदाल म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.