Rajasthan Polls: मला मुख्यमंत्रीपद सोडायची इच्छा आहे, पण...; अशोक गेहलोतांनी सचिन पायलट यांना खिजवलं

Rajasthan Polls
Rajasthan Polls
Updated on

नवी दिल्ली- राजस्थानसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशोक गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मला राजस्थानचे मुख्यंमत्रीपद सोडायचं आहे, पण हे पदच मला सोडायला तयार नाही, असं ते म्हणाले आहेत. असं वक्तव्य करुन त्यांनी सचिन पायलट यांना खिजवल्याचं बोललं जातंय.

एका महिलेने मला सांगितलं की, देवाची इच्छा आहे तुम्ही चौथ्यांना मुख्यमंत्री व्हावं. मी तेव्हा त्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्रीपद सोडायचं आहे, पण मुख्यमंत्री पदच मला सोडत नाहीये. आणि भविष्यातही हे पद मला सोडेल असं वाटत नाही, असं अशोक गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेच उमेदवार असतील हे त्यांनी या वक्तव्यातून जाहीर केलं आहे.

Rajasthan Polls
Assembly Elections : राजस्थान विधानसभेसाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात?, केली 'ही' तयारी

सोनिया गांधीजी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांनी पहिला निर्णय मला मुख्यमंत्री करण्याचा घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हतो, पण त्यांनी मला मुख्यमंत्री केलं. मला मुख्यमंत्रीपद सोडायचं आहे, पण हे पद मला सोडत नाहीये आणि ते भविष्यात सोडेल असं मला वाटत नाही, असं अशोक गेहलोत म्हणाले.ते पुढे असंही म्हणाले की, माझ्यात काहीतरी खास असेल म्हणूनच मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून निवडलं.

राजस्थानमध्ये काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडीवरुन अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु आहे. २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे, पण काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा वाद पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Rajasthan Polls
Rajasthan Election : राजस्थान विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार? पक्षाचा मास्टर प्लॅन आला समोर

सचिन पायलट यांनी २०२० मध्ये पक्षात बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. पण, अशोक गेहलोत यांच्यामुळे ती इच्छा अपूर्ण राहत आहे.यावर बोलताना गेहलोत म्हणाले की, पक्षामध्ये एकजूट आहे. तसेच सचिन पायलट यांनी सूचवलेल्या एकाही उमेदवाला मी विरोध केलेला नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.