'मी चहावाला ते पाकला इशारा'; मोदींच्या भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे

'मी चहावाला ते पाकला इशारा'; मोदींच्या भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे
Updated on

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेतील ७६ व्या सत्रामध्ये सहभागी झाले. त्यांनी जवळपास 25 मिनिटे हिंदीतून संबोधन केलं. गेल्या वर्षी या संयुक्त राष्ट्र महासभेचं सत्र करोनामुळे प्रत्यक्षात आयोजित न करता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. पंतप्रधान मोदी अफगाणिस्तान प्रश्न, कोरोना महासाथ या साऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलले ते थोडक्यात...

मोदींच्या भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे

  • मी चहावाल्याचा मुलगा...

    PM मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात आपली ओळख करवून देत केली, त्यांनी म्हटलं की एक लहान मुलगा जो रेल्वे स्टेशनवर चहा विकायचा तो आता भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्रसभेसमोर भाषण करतो आहे. स्वत:ची ओळख अधोरेखित करत त्यांनी म्हटलं की, गेल्या तीन टर्म मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि आता पंतप्रधान म्हणून देशवासीयांची सेवा करताना मला एकूण 20 वर्षे होत आहेत. मी माझ्या अनुभवावरुन सांगतो, हो! लोकशाही साकारली जाऊ शकते.

  • विविधता हेच भारताचे सामर्थ्य

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग एका महामारीशी लढा देत आहे. मी त्या सर्वांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. मी त्या देशाचं प्रतिनिधीत्व करतो ज्या देशाल 'मदर ऑफ डेमोक्रसी' म्हणून ओळखलं जातं. यावर्षीच भारताने आपल्या 75 व्या वर्षांत पदार्पण केलंय. आमची विविधता हेच आमचे सामर्थ्य आहे. इथे वेगवेगळ्या भाषा, जातीधर्म आहे. हे भारताच्या लोकशाहीची ताकद आहे.

  • भारत विकासाच्या दिशेने

    आज भारत विकासाच्या वाटेने निघाला आहे. विकास सर्वसमावेशी व्हावा, सर्वस्पर्षी आणि सर्वव्यापी, सर्वपोषक व्हावा हीच आमची प्राथमिकता आहे. गेल्या सात वर्षांमध्ये 43 कोटी नागरिकांहून अधिकांना बँक व्यवस्थेशी जोडून घेतलं आहे. 36 कोटीहून अधिक लोकांना विमा कवच मिळालं ज्यांना आधी हा विचारही मनात यायचा नाही. 50 कोटी हून अधिक नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या आहेत. 3 कोटी कोटी पक्के घर बनवून बेघर लोकांना घर दिले आहे. आज जगातील प्रत्येक सहावा नागरिक हा भारतीय आहे. त्यामुळे भारताचा विकास होताना जगाचाही विकास होतो आहे. भारत अमृतमहोत्सवी वर्षांत 75 उपग्रहांना अंतराळात पाठवणार जे मुलांनी तयार केलेलं असेल.

  • जगासमोर अतिरेकी विचारसरणीचा धोका

    आज जगासमोर अतिरेकी विचारसरणीचा धोका आहे. जगाला सध्या विज्ञानाधारित विवेकी विचारसरणीची जगाला आवश्यकता आहे. त्यामुळेच भारत अनुभवाधिष्टीत शिक्षणाला प्राधान्य देत आहे. आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना उत्तरं द्यायची आहेत. जेंव्हा निर्णय घ्यायची वेळ होती ज्यांच्यावर निर्णय घ्यायची जबाबदारी होती ते काय करत होते.

  • पाकिस्तानला कानपिचक्या

    अफगाणिस्तानची परिस्थिती आपण पाहतोय. तिथल्या महिलांना, मुलांना, अल्पसंख्यांना मदतीची गरज आहे. त्यांच्या प्रती आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद आणि दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. जे देश प्रतिगामी विचारसरणीने चालत आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की दहशतवाद त्यांच्यासाठीही धोक्याचा आहे. दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो. पंतप्रधान मोदींचा संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

  • भारत जगाला लस पुरवतोय

    भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आमच्या जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा.

  • संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणेची गरज

    संयुक्त राष्ट्रांच्या कार्यपद्धतीबाबत अनेकवेळा टीका केली जाते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांना आपल्या परिणामकारकता वाढवण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. पर्यावरण, कोरोना, दहशतवाद, अफगाणिस्तानचा प्रश्न अशा अनेक मुद्यांमुळे या शंका अधिकच वाढल्या आहेत. नोबेल विजेते रविंद्रनाथ टागोरांच्या ओळींनी मी माझं भाषण थांबवतो. म्हणजेच आपल्या शुभ कर्मावर विश्वास ठेवून तू पुढे चाल, आपोआपच दुष्ट शक्ती नष्ट होतील. या ओळी संयुक्त राष्ट्रांसाठी तसेच सर्व देशांसाठी मार्गदर्शक ठरतील. आपले प्रयत्न नक्कीच जगाला शांततेच्या दिशेने घेऊन जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.