नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी स्वतःची तुलना श्रीकृष्णाशी करत एक विधान केलं आहे. यामुळं राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडण्याची शक्यता आहे. गुजरातमधील राजकीय सभेत त्यांनी हे विधान केलं. (I was born on Krishna Janmashtami God sent me to Gujarat on a special mission says Arvind Kejriwal)
"मी कृष्ण जन्माष्ठमीला जन्मलोय आणि देवानंच मला कंसाच्या वारसांचा जसं गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांचा नाश करायला विशेष मोहिमेवर पाठवलं आहे. आम्ही सर्वजण देवाचं हे काम पूर्ण करु", असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
आपचे नेते राजेंद्र पाल गौतम यांच्याबाबतच्या वादावरुन भाजपने केजरीवालांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान पोस्टर झळकवले आहेत. या पोस्टर्सवरुन अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. जेव्हापासून माझा गुजरातचा दौरा निश्चित झाला आहे, तेव्हापासून भाजपनं माझ्याविरोधात पोस्टरबाजी सुरु केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हे लोक माझा द्वेष करतात त्या पोस्टर्सवर देवाविरोधात अपशब्द लिहिले आहेत. देवाचा त्यातून अपमान करण्यात आला आहे. मी धार्मिक माणूस आहे, हनुमानाचा कट्टर भक्त आहे. माझ्यावर हनुमानाची अत्यंत कृपा आहे. माझा जन्म कृष्णजन्माष्ठमीला झाला असून देवानं मला विशेष मोहिमेवर पाठवलं आहे, असं यावेळी केजरीवाल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.