Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

Arvind Kejriwal: माझी चूक झाली! अब्रुनुकसानीच्या खटल्यात केजरीवालांना मागावी लागली माफी; काय आहे प्रकरण?

delhi cm arvind Kejriwal had to apologizeभाजप आयटी सेल संबंधातील एका अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माफी मागावी लागली आहे. त्यांनी आपली चुकी मान्य केली आहे.
Published on

नवी दिल्ली- भाजप आयटी सेल संबंधातील एका अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माफी मागावी लागली आहे. त्यांनी आपली चुकी मान्य केली आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकाने सुप्रीम कोर्टात याची माहिती दिली. अपमानजनक व्हिडिओ रीट्वीट करुन त्यांनी चूक केली आहे, असं ते कोर्टात म्हणाले आहेत. (I was wrong delhi cm arvind Kejriwal had to apologize in supreme court case)

भाजप नेत्याकडून याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी ११ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. अब्रुनुकसानीचा दावा रद्द करावा यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण, त्यांना इथेही अद्याप दिलासा मिळालेला नाही.

Arvind Kejriwal
India Aghadi : 'इंडिया आघाडी'च्या धास्तीने भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू

अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने विचारलंय की, केजरीवाल यांनी माफी मागितली असल्याने त्यांना खटला मागे घ्यायचा आहे का? उत्तर देण्यासाठी तक्रारकर्त्याला ११ मार्चपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील सुनावणी घेण्यात येईल.

काय होतं प्रकरण?

हे प्रकरण २०१८ मधील आहे. प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये भाजप सरकारविरोधातील काही गोष्टी दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. ही पोस्ट केजरीवाल यांनी रीट्वीट केली होती. त्यानंतर 'आय सपोर्ट नरेंद्र मोदी' नावाचे सोशल मीडिया पेज चालवणारे विकास संकृत्यायन यांनी केजरीवाल यांच्या विरोधातात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal: "भाजपच्या अधर्माच्या राजकारणाच्या नाशासाठी 'कृष्ण' घेणार जन्म"; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

केजरीवाल यांनी पुराव्यांची पडताळणी न करता त्यांच्यावर अपमानजनक माहिती देणारा व्हिडिओ रीट्वीट केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असं म्हणत विकास संकृत्यायन आकम्रक झाले होते. याप्रकरणी हायकोर्टाने केजरीवाल यांना समन्स पाठवला होता. हायकोर्टाने कलम ४९९ अंतर्गत अपमानजनक मजकूर रीट्विट करणे गुन्हा असल्याचं म्हटलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.