PM Modi : 'या' कारणासाठी मी मोदींना भेटेन, सरकारनं 'हा' प्रस्ताव पास करावा; असं का म्हणाले रामभद्राचार्य महाराज?

भोपाळचं (Bhopal) 'भोजपाल' झालं तर संस्कृतचा स्वाभिमान जपला जाईल.
Rambhadracharya Maharaj Narendra Modi
Rambhadracharya Maharaj Narendra Modiesakal
Updated on

भोपाळ : जगद्गुरू रामभद्राचार्य महाराजांनी (Rambhadracharya Maharaj) भोपाळचं नाव बदलून 'भोजपाल' करण्याचा मुद्दा उपस्थित केलाय. याबाबतची मागणी त्यांनी पुन्हा केलीये. शिवाय, रामभद्राचार्य यांनी याबाबत पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

रामभद्राचार्यांनी राज्याच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांना मुख्यमंत्री शिवराज (CM Shivraj) यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय. जर होशंगाबादचं नाव बदलून नर्मदापूरम करायचं असेल तर भोपाळला फक्त एक अक्षर 'ज' जोडावं लागेल. त्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश विधानसभेत मंजूर करावा, असंही त्यांनी म्हटलंय.

Rambhadracharya Maharaj Narendra Modi
Dhirendra Shastri : हिंदू राष्ट्रासाठी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री घेणार CM योगींची भेट; लवकरच भेटीची शक्यता

भोपाळचं (Bhopal) 'भोजपाल' झालं तर संस्कृतचा स्वाभिमान जपला जाईल. संस्कृतचा अभिमान आपल्या राष्ट्राशी जोडलेला आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आपला प्रस्ताव पारित करावा, जेणेकरून मी लवकरच भोपाळला येऊ शकेन, असं रामभद्राचार्यांनी सांगितलंय.

Rambhadracharya Maharaj Narendra Modi
धक्कादायक! भाजप नेत्यासह आख्या कुटुंबानं प्राशन केलं विष; चौघांचा मृत्यू, खोलीत सापडला महत्वाचा..

'भोपाळचं नाव भोजपाल झालं, तरच मी भोपाळला येईन'

'जोपर्यंत भोपाळचं नाव भोजपाल होत नाही, तोपर्यंत मी पुढची कथा करायला येणार नाही. रामभद्राचार्य पुढं म्हणाले, भोजपाल नगरीचा राजा भोजपालक होता. अलाहाबादचं नाव प्रयागराज, फैजाबादचं नाव बदलून अयोध्या झालं आहे, मग भोपाळचं नाव बदलून भोजपाल का होऊ शकत नाही? मी माझा धाकटा भाऊ सीएम शिवराज सिंह चौहान यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी नाव बदलायला सांगेन, असंही त्यांनी सांगितलं. खासदारांनी विधानसभेत प्रस्ताव आणून भोपाळचं नाव बदलून भोजपाल करावं, असंही त्यांनी सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांना सांगितलं. मध्य प्रदेशात भोपाळचं नाव बदललं तर मी पुन्हा इथं येईन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.