PHOTOS : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठं पाऊल! INS विक्रांतवर 'तेजस' चं यशस्वी लँडिंग

सोमवारी नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांतवर लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचे (LCA) यशस्वी लँडिंग केले.
INS Vikrant
INS Vikrant Sakal
Updated on

INS Vikrant : भारतीय नौदलाने आज आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

सोमवारी नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांतवर लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचे (LCA) यशस्वी लँडिंग केले. भारतीय नौदलाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली आहे. यामुळे भारताची क्षमता अधिक स्पष्टपणे आधोरेखित झाली आहे.

भारतीय नौदलाने @indiannavy या ट्विटर हँडलवर या ऐतिहासिक क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये तेजस आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरताना दिसत आहे.

INS Vikrant
Pratik Patil : जयंत पाटलांच्या मुलाची राजकारणात धडाक्यात एन्ट्री; 'या' कारखान्याचं जिंकलं संचालक पद

ही छायाचित्रे शेअर करताना भारतीय नौदलाने लिहिले की, 'भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून, आयएनएस विक्रांतवर पायलटने लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट यशस्वीपणे लँड केले आहे.

INS Vikrant
Turkey Earthquake Update : पुन्हा हादरलं तुर्की! मृतांचा आकाडा चौदाशे पार; बचावकार्य सुरू

आयएनएस विक्रांत विविध वैशिष्ट्यांनी आहे सुसज्ज

45 हजार टन वजनाची INS विक्रांत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय नौदलात दाखल झाली आहे. INS विक्रांतच्या निर्मितीसाठई एकूण 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

INS विक्रांत बद्दल बोलायचे तर ही युद्ध नौका 262 मीटर लांब, 62 मीटर रुंद आणि 59 मीटर उंच आहे. यावर एकाचवेळी 1,700 क्रू मेंबर्स प्रवास करू शकतात. एवढेच नव्हे तर, यात महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष केबिनचा समावेश आहे. INS विक्रांतचा कमाल वेग सुमारे 28 नॉट्स आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()