भारतीय हवाई दलाने (IAF) पूर्व सागरी किनार्यावर सुखोई 30 एमकेआय विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाने सांगितले की, ही चाचणी मंगळवारी पूर्वेकडील सागरी किनार्याजवळ भारतीय नौदलाच्या समन्वयाने करण्यात आली.
यादरम्यान सुखोई 30 एमकेआय विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर लाईव्ह फायर करण्यात आले. भारतीय वायुसेनेने ट्विट केले की, मोहिमेदरम्यान, ब्रह्मोस क्षेपणास्त्र थेट त्याच्या लक्ष्यावरील नौदलाच्या जहाजावर आदळले. ही चाचणी यशस्वी झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले.
या चाचणीनंतर भारतीय वायुसेनेला ब्रह्मोस क्षेपणास्त्राने दिवस-रात्र आणि सर्व हवामान परिस्थितीत अचूकतेसह समुद्र किंवा जमिनीवरील कोणत्याही लक्ष्यावर प्रहार करण्याची क्षमता मिळाली आहे. क्षेपणास्त्राची क्षमता आणि Su-30MKI विमानाच्या उच्च कार्यक्षमतेमुळे IAF ला युध्दात जमिनीवर आणि समुद्रावरील युध्दभूमिवर वर्चस्व मिळवता येईल.
11 एप्रिल रोजी, भारताने स्थानिक पातळीवर विकसित केलेले अँटी-टँक गायडेड मिसाइल (ATGM), हेलिना याची, अडव्हांस लाइट हेलिकॉप्टर (ALH) वरून हाय अलटीट्यूडवर यशस्वीरित्या चाचणी केली होती. ज्यामुळे हेलिकॉप्टरसोबत शस्त्रास्त्रांच्या एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारतीय हवाई दल आणि लष्कर यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली. हेलिना किंवा हेलिकॉप्टरवर बेस्ड नाग मिलाइल सात किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते.
इन्फ्रारेड इमेजिंग सीकर सिस्टीमद्वारे मार्गदर्शन केलेल्या फायर-अँड-फोरगेट क्षेपणास्त्राने हाय अलटीट्यूड रेजमध्ये सिम्युलेटेड टँक हे लक्ष्य यशस्वीरित्या भेदले, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले.
23 मार्च रोजी भारताने अंदमान आणि निकोबारमध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. संरक्षण अधिकार्यांनी सांगितले की, विस्तारित पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने अचूकतेने लक्ष्य गाठले अशी माहिती दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.