पाटणा : बिहारच्या IAS हरजोत कौर भामरा यांनी त्यांच्या संतापजनक वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे. एक पत्र जारी करून त्यांनी लिहिले की, "कार्यक्रमात बोलल्या गेलेल्या काही शब्दांमुळे कोणत्याही मुलीच्या किंवा तिथे उपस्थितांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी अध्यक्ष कम व्यवस्थापन संचालक हरजोत कौर खेद व्यक्त करते.
माझा उद्देश कोणाला खाली दाखविण्याचा किंवा अपमानित करण्याचा अजिबात नव्हता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, तर त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होता, असंही भामरा यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.
यापूर्वी महिला आयोगाने दखल घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आयएएसच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दोषी आढळल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं.
महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने 'सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टूवर्ड्स एन्हांसिंग द व्हॅल्यू ऑफ गर्ल चाइल्ड' या विषयावर मंगळवारी पाटणा येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एका विद्यार्थीनीने प्रश्न विचारला होता की, हे सर्व ड्रेस सरकार देते, मग सॅनिटरी पॅड मोफत का मिळत नाही? त्यावर महिला अधिकाऱ्याने सर्व मर्यादा पार करून त्या मुलीला उत्तर दिले की आज सॅनिटरी पॅड मागताय, उद्या मुलांना कंडोमपण मोफत द्यावे लागतील. त्यावर एका मुलीने प्रश्न केला की जनतेच्या मताने सरकार बनते, त्याला महिला अधिकाऱ्याने मूर्खपणाचा कळस म्हटलं होत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.