IAS coaching Center :उशीराचं शहाणपण! ३ विद्यार्थांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी पोहचले बुलडोझर; 'त्या' थारच्या ड्रायव्हरलाही अटक

IAS coaching centre deaths MCD begins bulldozer action : तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर या शिकवणी वर्गांमधील दुरवस्थेचा मुद्दा समोर आला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले झात आहेत.
IAS coaching centre deaths MCD begins bulldozer action
IAS coaching centre deaths MCD begins bulldozer action esakal
Updated on

दिल्लीतील राजेंद्र नगर येथे नागरी सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस राऊज आयएएस स्टडी सेंटरमध्ये तळघरातील ग्रंथालयामध्ये पाणी साचल्याने दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाकडून कोचिंग क्लासच्या जवळपासचे अतिक्रमण हटवण्यासाठी ५ बुलडोझर पाठवण्यात आले आहेत.

या कारवाईपूर्वी एमसीडीने दिल्ली पोलिसांकडे कारवाई करण्यासाठी परवाणगी मागितली होती, पोलिसांनी देखील या कारवाईला हिरवा झेंडा दाखवला होताा

IAS coaching centre deaths MCD begins bulldozer action
Delhi Coaching Centre: दूध विकून श्रेयाला IAS साठी तयार करत होते वडील, स्वप्न राहिलं अधूरं... प्रशासनाने घेतला भावी अधिकाऱ्याचा बळी!

तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर या शिकवणी वर्गांमधील दुरवस्थेचा मुद्दा समोर आला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले झात आहेत. यादरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना अटक केले आहे. याआधी कोचिंग सेंटरचा मालक आणि कोऑर्डिनेटर यांना देखील अटक करण्यात आली होती. म्हणजेच या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी रस्त्यावरून थार गाडी घेऊन गेलेल्या व्यक्तीला देखील अटक केली आहे. हा व्यक्ती मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी घेऊन गेला होता. ही गाडी नेल्यानेच प्रेशर वाढले आणि पाणी बिल्डिंगमध्ये घुसल्याचे सांगितले जात आहे.

IAS coaching centre deaths MCD begins bulldozer action
फक्त १२वीत अभ्यास करून भागणार नाही! ९वी, १०वी अन् ११ वीच्या गुणांवर ठरणार निकाल; NCERTच्या रिपोर्टमध्ये आला नवा फॉर्म्युला

नेमकं काय झालं होतं?

दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जुन्या राजेंद्र नगर भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच भागात असलेल्या राऊज आयएएस स्टडी सेंटरच्या तळघरात असलेल्या ग्रंथालयामध्येही पाणी शिरणे सुरू झाले. त्यामुळे या ठिकाणी अभ्यास करत असलेले विद्यार्थी अडकून पडले. काही मिनिटातच तब्बल बारा फुटापर्यंत पाहणी साचल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही. यामुळे उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या या दोन विद्यार्थिनी तसेच केरळमधील नेविन डॅल्विन या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. यानंतर घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

IAS coaching centre deaths MCD begins bulldozer action
'इथे' महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना बनवतात नपुंसक; नेमका काय आहे कायदा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.